Join us
Daily Top 2Weekly Top 5

असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 14:18 IST

सोशल मीडियावर सध्या अशाच एका वीर माऊलीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून कोणत्याही व्यक्तीचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत.

'आई' स्वतःच्या दुःखाचा विचार न करता केवळ आपल्या मुलांच्या सुखासाठी झटत असते. आपल्या मुलांचं चांगलं व्हावं यासाठी ती सतत धडपडत असते. सोशल मीडियावर सध्या अशाच एका वीर माऊलीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून कोणत्याही व्यक्तीचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. अपंगत्व असतानाही केवळ आपल्या मुलाचं शिक्षण थांबू नये आणि त्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी ही आई ज्या जिद्दीने कष्ट करत आहे, त्याने समाजासमोर एक मोठा आदर्श ठेवला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसतं की, ही आई आपल्या अपंगत्वावर मात करत आपल्या मुलाची बॅग पाठीवर घेऊन त्याला शाळेत सोडण्यासाठी जात आहे. मुलाच्या शिक्षणासाठी ती हे सर्व करत आहे. शरीराचा खालचा भाग निकामी झालेला असताना, चालताना होणारा त्रास सहन करूनही, तिने आपल्या चेहऱ्यावर हास्य कायम ठेवलं आहे.

मुलाच्या हातात पाटी-पेन्सिल असावी आणि त्याने समाजात मानानं जगावं, हीच एकमेव आशा तिच्या डोळ्यांत स्पष्टपणे दिसून येते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर काहीही करता येतं, हेच तिने दाखवून दिलं आहे. हा व्हिडीओ केवळ एका आईचा संघर्ष नाही, तर तो शिक्षणाप्रती असलेल्या निष्ठेचा एक भाग आहे.

आजच्या काळात जिथे अनेकजण छोट्या संकटांनी खचून जातात, तिथे ही आई कोणत्याही तक्रारीशिवाय परिस्थितीशी दोन हात करत आहे. नेटिझन्सकडून या आईच्या जिद्दीला सलाम केला जात असून तिच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येताना दिसत आहेत. "आई ही खरोखरच योद्धा असते" अशा कमेंट्सचा सोशल मीडियावर पाऊस पडत आहे. जर तुमच्याकडे जिद्द असेल तर गरिबी आणि अपंगत्व हे शिक्षणाच्या आड येऊ शकत नाही. या आईची ही धडपड समाजातील अशा अनेक पालकांसाठी प्रेरणादायी आहे जे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Unbearable pain, but mother's only wish: Son should learn.

Web Summary : A disabled mother's unwavering dedication to her son's education is inspiring. Despite physical challenges, she ensures he attends school, demonstrating immense willpower and devotion, setting a powerful example for society.
टॅग्स :सोशल व्हायरलव्हायरल व्हिडिओशिक्षण