जळगाव शहरातील मणियार मैदानाच्या मागील अंकुर हॉस्पिटलच्या तळघरातील साईप्रसाद मेडिकल स्टोअर एका अज्ञात चोरट्याने टॉमीच्या साहाय्याने फोडून ४० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली़ ...
पहूर येथील कसबे भागातील रहिवासी तथा रिक्षाचालक विजय रामदास थोरात (४७) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. त्याच्यावर खासगी वित्तसंस्थेचे कर्ज होते. या विवंचनेतून त्याचे आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. ...
खान्देशचे राजकारण दोन ‘भाऊं’वर केंद्रित आहे. पहिले नाथाभाऊ अर्थात एकनाथराव खडसे आणि दुसरे गिरीशभाऊ अर्थात गिरीश महाजन. नाथाभाऊंच्या वलयातून बाहेर पडल्यावर आणि मुख्यमंत्र्यांची छत्रछाया लाभल्यावर गिरीशभाऊ विक्रमांची बरसात करीत आहे. ...
इंग्रजी भाषेला आलेल्या आंत्यतिक महत्त्वामुळे प्रादेशिक भाषा आणि बोलीच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासाठी मराठी भाषा सक्तीची केली गेली पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक गो.तु.पाटील यांनी व्यक्त केले. ...