Next

गिरणी कामगारांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात | Varan Bhat Loncha |

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 02:32 PM2022-01-14T14:32:13+5:302022-01-14T14:32:31+5:30

मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते, निर्माते महेश मांजरेकर वेगळ्या आणि हटके विषयावर आधारित चित्रपट करण्यासाठी ओळखले जातात.. काही महिन्यांपूर्वी त्यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी नथुराम गोडसे या चित्रपटाची घोषणा केली होती.. त्यानंतर ते चर्चेत आले होते.. यावरून त्यांच्यावर टीकाही झाली होती.. त्यानंतर महेश मांजरेकर आता पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.. आणि यासाठी कारणीभूत ठरला आहे त्यांचा आगामी चित्रपट 'नाय वरण, भात, लोन्चा कोण नाय कोन्चा'.. त्यांच्या या चित्रपटातील काही दृश्ये वरून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे.. नेमकं काय प्रकरण आहे पाहूयात या रिपोर्टचा माध्यमातून... (Kiran Story)