बोंडअळीने कपाशीचे पीक फस्त केले. यामुळे शेतकरी हवालदिल झाले. आता आर्वी उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील ४९९ गावांतील तूर पिकावर रोगाचे आक्रमण झाले आहे. ...
पारधी बेड्यावरील शंकेश पंकज चव्हाण यांच्या घराला अचानक आग लागली. यात घरातील कपडे, भांडी, गहू, तांदुळ जळून खाक झाले. यात त्यांचे ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी पहाटे ३ ते ४ वाजताच्या सुमारास घडली. ...
गावे शहरांशी जोडण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेला आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, असे नाव दिले आहे. योजनेचा उद्देश चांगला असला तरी काही काळापासून ती कुरणच ठरत आहे. ...
हल्लाबोल यात्रेदरम्यान बोंड अळीच्या हल्ल्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व खा. सुप्रिया सुळे यांना आवाहन करीत त्यांच्याकडून कपाशीच्या पिकावर नागर फिरवून ही व्यथा शासन दरबारी पोहोचविण्याची विनंती केली. ...
हावरे ले-आऊट सेवाग्राम येथील आयएसओ मानांकित जि.प. प्राथमिक शाळेला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांशी अभ्यासावर चर्चा केली. ...
खरांगणा येथील बँक आॅफ इंडियाच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास हात साफ केला. एटीएममध्ये नेमकी किती रक्कम होती याबाबत बँकेकडे माहिती नाही. २२ डिसेंबरला या एटीएममध्ये ५२ हजार रुपये होते, असे सांगण्यात आले. ...
दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात ज्या प्रमाणात दारूचा व्यवसाय होतो, त्याच तुलनेत गांजाचा व्यवसाय होत असल्याचे वास्तव आहे. याच गांजाच्या आहारी गेलेल्या युवकांकडून हत्येसारखे गुन्हे घडत आहेत. ...
जगात कृषीप्रधान देश अशी भारताची ओळख. परंतु, सध्या कृषीक्षेत्रातील अनेक अडचणीमुळे शेती करणेही कठीण झाले आहे. आज शेतीतून अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या मूलभूत गरजा भागवण्याचे सामर्थ्यही बळीराजात नाही. ...
समाजाच्या सुखात आपले सुख आणि दु:खात आपले दु:ख जो बघतो. शिवाय आपल्या सुख-दु:खात जो सामान्य राहून भाविकांना ईश्वराकडे जाण्याचा खरा मार्ग सांगतो; तोच खरा साधू-संत आहे, अशी माहिती भागवत कथा प्रवक्ता जयाकिशोरीजी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ...