जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज ग्रामसेवकांसह बीडीओही मुख्यालयी राहात नसल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. तीन दिवसांत ग्रामसेवकांनी मुख्यालय न गाठल्यास कारवाई होणार असून बीडीओंबाबत सीईओ निर्णय घेतील, असे ठरले. ...
जिल्ह्यात किमान एक हजार नव्या शिक्षकांची भरती होईल, अशी बेरोजगारांना अपेक्षा असताना शिक्षण विभागाने केवळ ९५ पदांंची जाहिरात पवित्र पोर्टलवर झळकविली आहे. प्रत्यक्षात पोर्टलच्या आॅनलाईन कारभारामुळे २०१८ ऐवजी २०१२ मधील मान्य पदे ग्राह्य धरण्यात आली. ...
गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात लोकार्पण झालेल्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता १०० खाटांचे हे रुग्णालय आता २०० खाटांचे होणार आहे. त्यासाठी वाढीव १०० खाटांना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मंजुरी दिली आहे. ...
वसापूर्वी रस्ते अधिक सुरक्षित रहावेत यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागा अंतर्गत अखत्यारित असलेल्या मार्गावर जिल्ह्यातील साडे तीन हजारांहून अधिक पूल आणि मोऱ्यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. संबंधितांच्या अहवालानंतर धोकादायक ठिकाणी उपाययोज ...
सोईच्या बदलीवेळी चुकीची माहिती भरणाऱ्या शिक्षकांवरील कारवाई टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांना सदस्यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये धारेवर धरले. अखेर यातील दोषी सर्व ११८ शिक्षकांची वेतनवाढ रद्द करण्याचा ठराव यावेळी ...
जिलहा परिषदेच्या आरोग्य व ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कर्मचा-यांच्या बदली प्रक्रियेत बिगर आदिवासी भागातून आदिवासी भागात बदली केल्यास मोठा असमतोल निर्माण होत असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन या दोन्ही विभागांच्या बदल् ...
राष्ट्रीय हिवताप प्रतिरोध मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, नागरिकांनी डासांची उत्पत्तिस्थाने नष्ट करावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक आणि आरोग्य सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर यांनी केले. ...