सांगली महापालिकेच्या शेरीनाला योजनेतून धुळगावमधील शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. पण योजनेच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह तोडून पाण्याची चोरी होत आहे. पाणी चोरणाऱ्यांना जाब विचारल्यास त्यांच्याकडून धमकी, दमदाटीचे प्रकार होत आहेत. पाणी चोरीमुळे धुळगाव ...
सांगली शहरात वाढत्या वाहन संख्येमुळे पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात महापालिका व वाहतूक पोलिसांनाही अपयश आले आहे. सांगली शहराची वाढती वाहनसंख्या पाहता, केवळ बाजारपेठेच्या ठिकाणीच चार वाहनतळ आहेत. ...
हातकणंगले लोकसभा मतदार संघात महाआघाडीतील ‘स्वाभिमानी’चे उमेदवार राजू शेट्टी यांच्याविरोधात शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्या उमेदवारीने रंगत वाढली होती. आता या दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू झाले ...
बेदाण्याची खरेदी करून पैसे परत न केल्याबद्दल हैदराबाद येथील व्यापाºयाविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अजिज उमर मुल्ला (वय ४३, रा. मंगलमूर्ती कॉलनी) यांनी ...
मधुमेहासाठी जांभूळ गुणकारी असल्याचा ढोल पिटला जात असल्याने यंदा जांभूळ भाव खाण्याचा विक्रम करीत आहे. गतवर्षी १८0 ते १९0 रुपये किलो असणाऱ्या जांभळाला आता २२० रुपये मोजावे लागत आहेत. ग्राहकांसाठी आंबट झालेली जांभळे उत्पादकांना मात्र गोड दिलासा देत आहेत ...
संपूर्ण दक्षिण भारतातून वाढलेल्या हळदीच्या आवकेमुळे सांगलीच्या बाजारपेठेतील उलाढाल वाढली असतानाच, बुधवारी झालेल्या हळद सौद्यावेळी हळदीला सरासरी ६ ते ११ हजारपर्यंत दर मिळाला. यंदाच्या हंगामात हळदीचा दर ११ हजाराच्या वर पोहोचल्याने शेतकऱ्यांनी ...
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्यासाठी सहकारी व सेवाभावी संस्थांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. ...