भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात विरोधी पक्षांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली एकत्र यावे व महाआघाडी स्थापन करावी असा प्रस्ताव खासदार संजय राऊत यांनी पुढे आणला. ...
मच्छिमारी महामंडळ स्थापण्याच्या प्रस्तावाची फाईल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी फेटाळली असून ती का फेटाळली हे जनतेला कळायला हवे, अशी मागणी विनोद पालयेंकर यांनी केली आहे. ...