तालुक्यातील मोहटे ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ. हर्षवर्धन साहेबराव पालवे यांच्यावर ९ पैकी ७ ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत कामात सरपंच विश्वासात घेत नसल्याने ग्रामपंचायतीचे कामे खोळबून विकास खुंटला असल्याचे करणे देत मंगळवारी अविश्वास ठराव दाखल केला होत ...
पत्नीचा खून केल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पावणेदोन वर्षांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील अकोला येथे पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा नाक-तोंड दाबून खून केला होता. ...
भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धेसाठी पॉकलेन व जे.सी.बी. मशीन पुरविण्यात आली. या माध्यमातून तालुक्यातील सोळा गावांमध्ये १ अब्ज, ३५ कोटी, ८२ लाख ५० हजार लीटर पाणी साठा होणार आहे. त्यामुळे आता या सोळा गावांना पावसाची प्रतीक्षा आहे. ...
पाथर्डी तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या तिसगावच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे महिनाभरापासून प्रादेशिक नळ योजनेचा पाणी पुरवठाच बंद झाला आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाल्याने तिसगावकर तहानले आहेत. ...
पाथर्डी तालुक्यातील शिंगवे केशव गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी १९७२ मध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तयार झालेल्या पाझर तलाव क्षेत्रालगत नगर येथील एका व्यापाऱ्याने अतिक्रमण करून जागा बळकाविण्याचा प्रयत्न केला आहे. ...
पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीला विरोधकांकडून जाणीवपूर्वक टार्गेट करुन बदनाम केले जाते. समितीविरूध्द जे सत्याग्रहाला बसले त्यांनीच अतिक्रमण केले आहे. केलेले अतिक्रमण जिरले पाहिजे यासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे. तुमच्या ताब्यात असलेल्या संस्था कशा प ...
एम.ए.पर्यंतचे शिक्षण झाले. तरीही नोकरीच्या मागे न लागता आपण आपल्या शेती व जोडधंद्यातून अधिक पैसा कमावू शकतो, असा निर्धार करून शेतीत फळबाग लावून लाखो रुपये कमविण्याची किमया भोसे (ता. पाथर्डी ) येथील तरुण शेतकरी अशोक टेमकर यांनी करून दाखविली. ...