शेतात काम करीत असताना करंजी (ता. पाथर्डी) येथील बेबी सुहास अकोलकर या महिलेवर शनिवारी सकाळी रानडुकरांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या आहेत. ...
गेल्या दहा दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी वसंतराव नाईक चौकात ठिय्या आंदोलन चालू असून रविवारी सकाळी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे व आमदार मोनिका राजळे यांनी आंदोलनाला भेट देत जाहीर पाठिंबा दिला. ...
मारहाण व दमदाटीप्रकरणी पाथर्डी बाजार समितीचे माजी सभापती गहिनीनाथ शिरसाठ यांच्यासह त्यांच्या दोन भांवाना जिल्हा न्यायालयाने १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे़ जिल्हा व सत्र न्यायाधीश वी़वी़ बांबर्डे यांनी हा निकाल दिला़ ...
तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील दादा पाटील राजळे महाविद्यालयाचे शिपाई बलभीम छबु कांबळे (वय ४५) यांची मंगळवारी रात्री तिसगाव ते शेवगाव रस्त्यावर हत्या करण्यात आली. ...
पाथर्डी तालुक्यातील करंजीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भट्टीवाडीतील छानराज क्षेत्रे या शेतकऱ्याने सेंद्रिय शेती करून एकाच वेळी विविध २२ पिके घेण्याचे अनोखे धाडस करून वेगळा आदर्श शेतक-यांपुढे ठेवला आहे. ...