मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती. Read More
Mallikarjun Kharge: मल्लिकार्जून खर्गे यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष मजबूत होईल आणि केंद्रातील हुकूमशाही सरकारचा पराभव करेल, असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. ...
mallikarjun kharge: दरम्यान, कर्नाटकमधून येणाऱ्या मल्लिकार्जुन खर्गे यांच्या राजकीय कारकीर्दीची कमान ही उत्तरोत्तर चढती राहिली आहे. गेल्या काही काळात ते गांधी कुटुंबीयांचे विश्वासू बनले आहेत. मात्र एकेकाळी त्यांनी इंदिरा गांधींविरोधात बंड केले होते. ...