नीता केळकर यांची महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधार कंपनीत स्वतंत्र संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. संचालक मंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत त्यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. ...
वीज चोरी व त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वीज जोडणी घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. त्यानुसार, जिल्हयातील दोन हजार ७७९ शेतकºयांनी कृषी पंप जोडणीसाठी डिमांड भरले आहे. ...
येथील वीज वितरण कंपनीच्या वतीने प्रधानमंत्री सौभाग्य योजनेंतर्गत तालुक्यातील ४३० घरांना नव्याने वीज जोडणी देण्यात येणार आहे. महावितरण कंपनीने १५ आॅक्टोबरपर्यंत ३७२ घरांना वीज जोडणी दिली आहे. उर्वरित ५८ घरातील वीज जोडणीचे काम प्रगतीपथावर आहे. ...
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी 1 लाख सौर कृषी पंपाची योजना 3 वर्षात राबविण्यात येणार असून 1 लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. ...
शहरात महावितरण कंपनीने ९ तासांचे भारनियमन करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कंदील भेट देऊन आंदोलन केले. ...