IPL 2026, SRH 86 All Out As Shubman Gill's GT Clinch Huge Win, Go Top : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सच्या संघाने तगडी फलंदाजी असलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाला शंभरीच्या आत गुंडाळत दिमाखदार विजय नोंदवला. यंदाच्या हंगामातील ८ व्या विजयासह १६ गुणांची कमाई करत शुभमन गिलच्या संघाने प्लेऑफ्समधील स्थान निश्चित करताना पहिली क्वॉलिफायर खेळण्याची दावेदारीही भक्कम केली आहे. साई सुदर्शन ६१ (४४) आणि वॉशिंग्टनच्या ५० (३३) अर्धशतकाच्या जोरावर गुजरातच्या संघान निर्धारित २० षटकात ५ बाद १६८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादचा संघ ८६ धावांत आटोपला आणि गुजरात टायटन्सच्या संघाने ८२ धावांनी सामना जिंकला. गुजरातचा आयपीएलमधील हा सर्वात मोठा विजय ठरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संघ अडचणीत असताना साई सुदर्शन याने वॉशिंग्ट सुंदरच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी ४१ चेंडूत ६० धावांची भागीदारी रचली. साईने ४४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरनं आपल्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. त्याने ३३ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५० धावा केल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर गुजरातच्या संघाने निर्धारित २० षटकात ५ बाद १६८ धावा केल्या होत्या. सनरायझर्सच्या संघाकडून गोलंदाजीत प्रफुल हिंगे आणि साकीब हुसेन यांनी प्रत्येकी २-२ तर पॅट कमिन्सने एक विकेट घेतली.
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
धावांचा पाठलाग करताना SRH च्या फलंदाजांनी टाकली नांगी
गुजरात टायटन्सच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग सनरायझर्स हैदराबादने पहिल्या षटकापासून विकेटचा सिलसिला पाहायला मिळाला. मोहम्मद सिराजनं ट्रॅविस हेडला खातेही न उघडता माघारी धाडले. दुसऱ्या षटकात अभिषेक शर्मा एक षटकार मारून रबाडाच्या गोलंदाजीवर फसला. ठराविक अंतराने सनरायझर्स हेदराबादच्या संघाने विकेट गमावल्या. कर्णधार पॅट कमिन्सनं ९ चेंडूत केलेली १९ धावांची खेळी ही SRH कडून कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च खेळी ठरली. गुजरातकडून कगिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. प्रसिद्ध कृष्णाने २ तर सिराज आणि राशिद खान याने १-१ विकेट घेत हैदराबादचा डाव १४.५ षटकात ८६ धावांवरच आटोपला.