Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्याFOLLOW
Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
सामान्य माणसाच्या हिताची धोरणे आणि गावांचा विकास करण्याचा दृष्टिकोन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे. मराठा आरक्षणापासून ते अल्पसंख्याक समाज घटकांसाठी घेतलेल्या निर्णयामुळे युती सरकारची लोकाभिमुखता वाढली असल्याचा विश्वास गृहनिर्माण मंत्री ...
मतदारसंघासह पठारभागातील पाटपाण्याचे आणि रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे. सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही भाजपाचे उमेदवार वैभव पिचड यांनी दिली. ...
लोकसभा निवडणुकीदरम्यान खासदार सुनील तटकरे शिवसेना - भाजपमध्ये येण्यासाठी खासदारकीही सोडायला तयार होते. मात्र, घिरट्या मारूनही त्यांना प्रवेश मिळाला नाही, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय ऊर्जामंत्री व अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी येथे केला. ...
कर्जत-जामखेड मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून मागील २५ वर्षांपासून भाजपचे एकतर्फी वर्चस्व आहे. प्रथमच या निवडणुकीत पवार घराण्याने उमेदवारी करून भाजपापुढे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे भाजपला एकतर्फी वाटणारी निवडणूक रंगतदार बनली आहे ...