कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, आग्र्याच्या मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव दिलं जाईल. आता कंगनाने योगी आदित्यनाथ यांना टॅक करून एका खास गोष्टीसाठी त्यांचं कौतुक केलंय. ...