जागेचे पट्टे व आवास योजनेचा लाभ देण्यासह अन्य मागण्यांसाठी अतिक्रमणधारकांनी युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात शनिवार ५ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. ...
शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील विविध भागात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना वणी शहरात मात्र अतिक्रमण हटावबाबत कुठल्याही हालचाली दिसत नाही. ...
वाढत्या थंडीने मजबूत घरात राहणाऱ्यांनाही हुडहुडी भरविली आहे. या वातावरणात यवतमाळात झोपड्यांवर बुलडोझर चालविले गेले. यामुळे छत हरविलेले नागरिक उघड्यावर आले. या गरीब कुटुंबांनी उघड्यावर रात्र जागून काढली. ...
छावणी परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने वडनेररोड येथील शिवसेना कार्यालयासह दोन अनधिकृत दुकान व हॉटेलचे स्वच्छतागृह जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करण्यात आले. ...