देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सत्तेवरून हटविणे हेच सध्या आपले एकमेव लक्ष्य असल्याने लग्न करण्याचा आपला तूर्तास तरी विचार नाही, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे सांगितले. ...
उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांची मैत्री आहे. ती अधिक घट्ट होण्यासाठी सतेज पाटील तुम्ही भाजपात जावा, असा सल्ला... ...
‘जब तक सूरज चांद रहेगा.... देश में संविधान रहेगा’, संविधान जलानेवालोंको.....जुते मारो, जुते मारो, संविधान जाळणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत आज काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास रास्ता रोको करण्यात आला. ...
काँग्रेस कार्यकर्त्यानी आप आपसातील मतभेद विसरुन जोमाने काम करुन तालुक्यात काँगे्रस पक्षाला बळकटी देण्याचे आवाहन माजी आ. तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया यांनी केले. ...