देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपदे देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय भ्रष्टाचार केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकरिता अर्ज करण्यासाठी ६ जुलैपर्यंत अर्ज पाठवता येणार असल्याचे काँग्रेस पक्षाने जाहीर केले आहे. ...
कुमारस्वामी सध्या 'व्हिलेज स्टे प्रोग्राम'अंतर्गत राज्यातील गावांचा दौरा करत आहेत शुक्रवारी ते कलबुर्गी जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यातील हेरुर गावात दाखल झाले होते. ...
याआधी १० जून रोजी सिद्धू यांनी प्रियंका गांधी आणि अहमद पटेल यांच्या उपस्थितीत राहुल यांची भेट घेतली होती. तसेच आपली बाजू मांडली होती. त्यावेळी पंजाबमध्ये सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यातील दुरावा कमी करण्याच्या सूचना अहमद पटेल यांन ...