Mumbai Indians Captain Hardik Pandya hints dropping Suryakumar Yadav after loss vs Punjab Kingsin : आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची विजयासह अगदी धमाकेदार अंदाजात सुरुवात केल्यावर मुंबई इंडियन्सची गाडी पटरीवरून घसरली आहे. मुंबईतील वानखेडेच्या घरच्या मैदानात पंजाब किंग्ससमोर संघाला सलग चौथा पराभव स्विकारावा लागला. या पराभवानंतर हार्दिक पांड्याने तिन्ही क्षेत्रात कमी पडलो, असे प्रामाणिकपणे कबुल केले. एवढेच नाही तर सर्वच क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब संघाचेही त्याने कौतुक केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मला आता काही बोलायचं नाही... असं का म्हणाला हार्दिक पांड्या?
पंजाबविरुद्धच्या सामन्यात सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागल्यावर हार्दिक पांड्या म्हणाला की, "खरं सांगायचं तर, माझ्याकडे सध्या जास्त काही बोलण्यासारखं काहीच नाही. मला वाटतं की, आमच्यात काही वैयक्तिक उणीव आहे की, संघ म्हणून आम्ही कमी पडतो आहे याचा नव्याने विचार करण्याची गरज आहे. नियोजनात उणीवा आहेत का? या प्रश्नाच उत्तरही शोधावे लागेल." पांड्याने कोणाचेही नाव घेतले नसले, तरी त्याचा रोख हा जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादवकडे असल्याचे दिसते. दोघेही यंदाच्या हंगामात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलेले नाहीत.
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
पांड्या वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार?
हार्दिक पांड्या पुढे म्हणाला, "मला वाटते की, आपण त्यांनाही श्रेय दिले पाहिजे. चेंडू रिव्हर्स होऊ लागला. दुसऱ्या डावात दव पडले आणि खेळ थोडा सुधारला, पण तरीही त्यांनी आमच्यावर मात केली. त्यांनी (पंजाब किंग्स) गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सर्वच बाबतीत सर्वोत्तम कामगिरी केली. या पराभवानंतर कठोर निर्णय घ्यायचे का? त्याचाही विचार करू, असे म्हणत त्याने टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला बाकावर बसवण्याची जणू हिंटच दिली आहे.
क्विंटन डी कॉक आणि नमन धीर वगळता सगळेच फेल
पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना रायन रिकल्टन पाठोपाठ सूर्यकुमार यादव खातेही न उघडता आल्या पावली माघारी फिरला. संघ अडचणीत असताना यंदाच्या हंगामात पहिला सामना खेळणाऱ्या क्विंटन डी कॉकनं नाबाद ११२ धावांची खेळी केली. बढती मिळालेल्या नमन धीरनं अर्धशतकी खेळीसह त्याला उत्तम साथ दिली. पण त्यानंतर अखेरच्या षटकात मुंबई इंडियन्सकडून कोणालाच मोठी फटकेबाजी करता आली नाही. पंजाब किंग्सच्या संघाने गोलंदाजीत चांगली सुरुवात केल्यावर डेथ ओव्हर्समध्ये मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांवर लगाम लावण्यात यश मिळवले. परिणामी मुंबई इंडियन्सच्या संघाला १९५ धावांपर्यंतच मजल मारता आली. हे आव्हान पंजाब किंग्सने ७ विकेट्स आणि २१ चेंडू राखून अगदी सहज पार केले. धावांचा बचाव करतानाही गोलंदाजीत अल्लाह मोहम्मद गझनफरशिवाय अन्य कोणालाही छाप सोडता आली नाही.