देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Mumbai Municipal Corporation News : आतापासूनच एक वर्ष मेहनत करा, महानगरपालिकेवर तिरंगा फडकल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसचा महापौर किंवा काँग्रेसशिवाय महापौर नाही ...
भाजप नेते राम मंदिराच्या नावाखाली गेली अनेक वर्षे हजार कोटी रुपये जमा केले, त्याचे काय झाले, अशी विचारणा करत राम मंदिराच्या नावाखाली देणग्या गोळा करतात आणि त्याच पैशाचा वापर करून रात्री मद्यपान करतात, असा गंभीर आरोप भूरिया यांनी केला आहे ...
आरएसएसचे लोक राममंदिरसाठी पावती घेऊन घराघरात पोहचत आहेत, आपण मात्र पदयात्रा काढून प्रत्येक घरात घरात जाऊन मुंबईकरांच्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्या सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले ...