देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यात जवळीक वाढल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरण्याचं कारण नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राष्ट्रीय प्रश्नांवर लढवल्या जात नाहीत असं उद्धवसेनेने म्हटलं. ...
Jubilee Hills Byelection : तेलंगामामधील हैदराबाद येथील जुबली हिल्स विधानसभा निवडणुकीचा निकाल सध्या चर्चेत आहे. या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नवीन यादव यांनी बीआरएसचा बालेकिल्ला भेदत दणदणीत विजय मिळवला. ...
Maha Vikas Aghadi: मुंबई महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा काँग्रेसने केल्यानंतर महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...