Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
अयोध्येत राममंदिराची निर्मिती झाल्यावर देशात शांती प्रस्थापित होईल. या मंदिरामुळे देशात विविध समुदायांमध्ये सामाजिक सौहार्द वाढेल, असे मत आध्यात्मिक गुरू व ‘आर्टऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले. ...
अनेक वर्ष रखडलेला अयोध्येचा प्रश्न आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या मध्यस्थीमुळेच निकाली लागला. अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे, यासाठी श्री श्री यांनी परिश्रम केल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे स्पष्ट केले. ...
वाढते सांप्रदायिक ध्रुवीकरण, अधिक तीव्र झालेली धार्मिक संवेदनशीलता आणि याचा फायदा घेण्यासाठी केले जाणारे अस्थिरतेचे राजकारण याचा उबग आलेल्या देशाने अयोध्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. ...