मीरा-भार्इंदर महापालिकेच्या कर विभागाकडे फेब्रुवारी २०१६ मध्ये माहिती अधिकारांतर्गत मागण्यात आलेली समाधानकारक माहिती न देणारे अधिकारी कोकण विभागीय माहिती आयोगाच्या द्वितीय अपिलाच्या सुनावणीस देखील अनुपस्थित राहिले. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण व उद्यान समितीची गेल्या अडीच महिन्यांत एकही बैठक पार न पडल्याने नाराज झालेल्या भाजपाच्या १० सदस्यांनी महापौर डिंपल मेहता यांच्याकडे नुकतेच राजीनामे दिले होते. ...
शहरातील हॉटेल व्यवसायिकांना कागदपत्रे सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ दिल्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केवळ पालिकेतील काही अधिकाऱ्यांना एक कोटी मिळाल्यानेच हॉटेलवाल्यांना मुदतवाढ दिल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्य ...
दोन लाख ग्राहकांनी ठाणे महापालिकेच्या प्रायोगिक तत्वावरील मोफत वायफाय सेवेचा फायदा घेतल्यानंतर आता खऱ्या अर्थाने ही सेवा पुढील पाच दिवसात प्रत्यक्षात सुरु करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार ही सेवा हवी असल्यास ठाणेकरांना पैसे मोजावे लागणार ...
डोंबिवली: सायकल मित्र संमेलनात १ हजार सायकलपटू डोंबिवली शहराच्या विविध भागातून सायकल चालवत संमेलनस्थळी पोहोचणार आहेत. त्यासाठी शहरातील प्रमुख पाच - सहा ठिकाणांहून २०० सायकलपटू एकाच वेळी सायकल चालवणार आहेत.२८ जानेवारी रविवारी सकाळी सहा वाजता ही रॅली ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत केलेली आघाडी ही त्यावेळेपुरती होती, अशी भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसने कल्याणमध्ये भाजपाला हाताशी धरत पंचायतीचे सभापतीपद पदरात पाडून घेतल्याने एकच गोंधळ उडाला. ...
कल्याण पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीनपैकी दोन सदस्यांनी शिवसेनेची साथ सोडून भाजपाशी हातमिळवणी केल्याने राष्ट्रवादीच्या दर्शना जाधव सभापती झाल्या. उपसभापतीपदी भाजपाचे पांडुरंग म्हात्रे विजयी झाले. ...
केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बाळसे धरले आहे, असा सर्वसाधारण समज असताना रविवारी हिंदू चेतना संगमाच्यानिमित्ताने जमलेल्या नव स्वयंसेवकांना विचारले असता गतवर्षी विजयादशमीच्या उत्सवापासून संघ ...
संक्रांतीचा गोडवा वाढवणा-या तिळगुळावर यंदा महागाईची संक्रांत आली आहे. तिळगुळाच्या लाडवांच्या दरात पाच टक्के तर हलव्याच्या दागिन्यांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यातही ज्येष्ठ नागरिकांना ‘अच्छे दिन’ आले असून त्यांना चावता येतील, असे नरम लाडू ...