माजी राज्यपाल आणि उदयनराजे यांच्यातील साताऱ्याची लढत रंगतदार होणार आहे. आता उदनयराजे भाजपमध्ये जावूनही आपला करिश्मा कायम राखतात, की शरद पवारांच्या चाणाक्ष चालींसमोर हतबल होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...
फलटण तालुक्यातील उपवळे, जाधवनगर, सावंतवाडा, दालवडी, दरेचीवाडी परिसरात परतीच्या पावसाची दमदार हजेरी. यामुळे वांजळे तलाव मंगळवारी फुटले. त्यातून लाखो लिटर पाणी वाहू लागल्याने ऊस, बाजरी पिकांचे नुकसान झाले आहे. ...
सातारा शहराबरोबरच जिल्ह्याच्या पश्चिम आणि पूर्व दुष्काळी भागातही सोमवारी सायंकाळपासून चांगलाच पाऊस पडला. यामुळे फलटण तालुक्यातील बाणगंगा आणि माणमधील माणगंगा नदीला पूर आला. तर कोयना परिसरात पाऊस झाल्याने धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला ...
गुप्ते यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी ३० हजार रुपये समीर कच्छीकडून घेतले होते. दरम्यान, काही दिवसानंतर राजेंद्र गुप्ते यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
कऱ्हाड -तासगाव मार्गावर पहाटे व्यायामाला गेलेल्या तिघांना भरधाव कंटेनरने चिरडले. किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा गावच्या हद्दीत पोल्ट्रीजवळ पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. अपघातानंतर चालक कंटेनरसह पसार झाला आहे. ...
काँग्रेसचे सातारा शहराध्यक्ष व नगरपरिषदेच्या विविध समित्यांचे माजी सभापती डॉ. रवींद्र्र भारती-झुटिंग यांनी आपल्या वैयक्तिक कारणाने सोमवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठविला आहे. ...