सातारा शहराध्यक्ष रवींद्र भारती-झुटिंग यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 05:48 PM2019-09-23T17:48:35+5:302019-09-23T17:49:19+5:30

काँग्रेसचे सातारा शहराध्यक्ष व नगरपरिषदेच्या विविध समित्यांचे माजी सभापती डॉ. रवींद्र्र भारती-झुटिंग यांनी आपल्या वैयक्तिक कारणाने सोमवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठविला आहे.

Satara city president Ravindra Bharti-Zuting resigns from Congress party | सातारा शहराध्यक्ष रवींद्र भारती-झुटिंग यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा

सातारा शहराध्यक्ष रवींद्र भारती-झुटिंग यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा

googlenewsNext
ठळक मुद्देसातारा शहराध्यक्ष रवींद्र भारती-झुटिंग यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामाभविष्यातील वाटचालीबाबत सहकाऱ्यांशी बोलून लवकरच निर्णय

सातारा : काँग्रेसचे सातारा शहराध्यक्ष व नगरपरिषदेच्या विविध समित्यांचे माजी सभापती डॉ. रवींद्र्र भारती-झुटिंग यांनी आपल्या वैयक्तिक कारणाने सोमवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठविला आहे.

झुटिंग हे गेली १९ वर्षे काँग्रेस पक्षाचे काम करत होते. २००३ ते २०१० या कालावधीत त्यांनी सातारा शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पडली. तर २०१० ते आजअखेर सातारा शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते. सातारा शहरात प्रतिकूल परिस्थिती त्यांनी काँग्रेस संघटना बांधण्याचे काम केले. या कालावधीत पक्षाच्या माध्यमातून नागरिकांची कामे करता आली. त्यांना मदत करता आल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

दहा वर्षे नगरसेवक व नगरपरिषदेच्या विविध समित्यांचे सभापती म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कामाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते अनेक सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, क्रीडा व आर्थिक संस्थांच्या माध्यमातून सातारा शहरात काम करत आहेत. सातारा शहर युवक व फादर काँग्रेस अध्यक्ष म्हणून १५ वर्षे काम करण्याची संधी पक्षाने व पक्षातील नेत्यांनी दिली. तसेच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. भविष्यातील वाटचालीबाबत ते सहकाऱ्यांशी बोलून लवकरच निर्णय घेणार आहेत.

Web Title: Satara city president Ravindra Bharti-Zuting resigns from Congress party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.