फक्त 1299 मध्ये घरी घेऊन या 12GB RAM असलेला 5G Smartphone; जाणून घ्या जबरदस्त Offers

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 06:20 PM2022-03-01T18:20:23+5:302022-03-01T18:25:38+5:30

Realme GT 5G स्मार्टफोन 12GB RAM, 256GB इंटरनल स्टोरेज आणि 4500mAh ची बॅटरीसह सादर करण्यात आला आहे. सध्या हा फोन Flipkart आणि Amazon या प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर स्वस्तात विकला जात आहे.

Realme GT 5G मध्ये 6.43-इंचाचा FHD+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटवर चालतो. हा डिस्प्ले 360Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो, जो गेमिंगच्या वेळी जास्त उपयुक्त ठरतो. हा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे.

फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 5G एसओसी आणि Adreno 660 GPU देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित Realme UI 2.0 वर चालतो. सोबत 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे.

या फ्लॅगशिप रियलमी फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G ड्युअल-मोड, 4G LTE, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, GPS, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि USB टाइप- C पोर्ट असे ऑप्शन देण्यात आले आहेत.

सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. तसेच, फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 65W फास्ट चार्जिंगसह 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

कॅमेऱ्यासाठी Realme GT 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलच्या मुख्य सेन्सरसह 8 मेगापिक्सलची वाइड-अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलच्या सेल्फी शुटर देण्यात आला आहे.

या फोनची किंमत 37,999 रुपयांपासून सुरु होते. परंतु फ्लिपकार्टवरून हा फोन 1,299 रुपयांच्या मासिक हप्त्यावर विकत घेता येईल. तसेच फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्डवर 5 टक्के कॅशबॅक ऑफरही मिळत आहे. Amazon वर देखील काही निवडक बँकेच्या कार्डवर 5 टक्क्यांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे.