वैद्यकीय क्षेत्रात 'प्लस' चिन्हाचा वापर का केला जातो?; जाणून घ्या यामागची रंजक कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 01:54 PM2020-02-28T13:54:05+5:302020-02-28T14:03:35+5:30

रुग्णालय, मेडिकल, डॉक्टर यांनी ओळख रेड क्रॉस म्हणजे प्लस चिन्हाने का होते? हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असेल, खूप कमी जणांना याबाबत माहिती आहे.

बऱ्याचदा आपल्या आयुष्यात आपण अशा गोष्टी पाहत असतो, त्याबद्दल आपण अनभिज्ञ असतो, तुम्ही कधी रुग्णालयात गेला असाल वा मेडिकलमध्ये, ही गोष्ट तुम्हाला दर्शनी भागात आढळून येते.

तसेच रेड क्रॉस चिन्हाचा चुकीचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही केली जाते. फक्त वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्था या चिन्हाचा वापर करु शकतात.

आपत्कालीन परिस्थिती जेव्हा आपल्याला एखाद्याचा जीव वाचवायचा असतो तेव्हा तातडीने अशा व्यक्तीला रुग्णालयात नेलं जातं. पण समजा तुमच्या जवळपास असं रुग्णालय दिसत नाही. लांब कुठेतरी प्लस(+) अशाप्रकारे चिन्ह दिसतं. त्यामुळे आपल्याला कळतं याठिकाणी मेडिकल अथवा हॉस्पिटल आहे.

पण प्लसचं चिन्ह नेमकं का दिलं असाव? हा विचार कधी तुमच्या मनात आला का? या प्लस चिन्हामागे काय कहाणी आहे. खूप कमी जणांना ही गोष्ट माहित असेल, बहुतांश जणांना माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबाबत सांगणार आहोत.

रेड क्रॉस हे चिन्ह वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित गोष्टींना दिलं जातं. हा एक संकेत आहे. कारण वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी सामाजिक संस्था रेड क्रॉस ही संघटना स्वित्झर्लंडच्या हेनरी डुनेंट आणि गुस्ताव मोनीयर यांनी स्थापन केली होती.

जागतिककरणानंतर अणुवस्त्र हत्यारांचा वापर, युद्धांमध्ये वाढ, भूकंप, वादळ अशासारख्या अनेक संकटांशी, अडचणीच्या वेळी वैद्यकीय मदत पुरवण्यामुळे आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संस्थेचे महत्त्व वाढलं.

हे चिन्ह नेहमी तुम्हाला हॉस्पिटल, नर्सिंग होम, दवाखाना, मेडिकल, रुग्णवाहिका अशाठिकाणी डॉक्टरांच्या निगडीत बाबींमध्ये पाहायला मिळतं. कारण आपत्कालीन वेळेप्रसंगी सहजरित्या ही ठिकाणं ओळखता येतील. याच कारणासाठी वैद्यकीय क्षेत्रात प्लस चिन्ह वापरलं जातं.

भारतात द इंडियन रेड क्रॉस सोसायटीची स्थापना १९२० मध्ये झाली. संपूर्ण जगासह भारतातही रेड क्रॉस चिन्ह वैद्यकीय क्षेत्रातील सेवेसाठी वापरण्यात आलं. १९४९ मध्ये जिन्हेवा करारात भारताने रेड क्रॉस चिन्ह मेडिकल क्षेत्रात वापरण्याची घोषणा केली.

सध्याच्या युगात परिस्थितीनुसार रेड क्रॉसची भूमिका बदलत चालली आहे. फक्त युद्धातील आजारी सैनिक, जखमींना मदत करणं इतकचं काम राहिलं नसून त्याचा विस्तार होत गेला. रेड क्रॉसचं महत्त्व वैद्यकीय क्षेत्रात भक्कमपणे वाढलं.

भारतात द इंडियन रेड क्रॉस सोसायटी १९५० मध्ये गठित करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने १९५० मध्ये जिनेव्हा करारावर स्वाक्षरी केली. त्यानंतर १० वर्षानंतर जिनेव्हा कराराचे काही नियम भारतात लागू करण्याबाबत संसदेत जिनेव्हा कन्वेंशन कायदा १९६० पारित केला