ब्लाऊजच्या बाह्यांच्या ८ डिझाइन्स पाहा-साध्या साडीचंही पालटतं रुप, लग्नसोहळा ते ऑफिसवेअर-सुंदर मनमोहक कलेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2026 21:00 IST2026-04-24T21:00:00+5:302026-04-24T21:00:02+5:30

Blouse sleeve fashion trends 2026: Traditional vs modern blouse sleeve styles: ट्रेडिंग बाह्यांचे ब्लाऊज डिझाइन्स पॅटर्न.

साडी कोणतीही असो, तिचा खरा लूक हा ब्लाऊजच्या फिटिंगवर आणि डिझाईनवर अवलंबून असतो. सध्याच्या काळात साध्या साडीलाही स्टायलिश बनवण्यासाठी ब्लाऊजच्या बाह्यांवर (Sleeves) नवनवीन प्रयोग केले जात आहेत.उन्हाळ्यात आणि लग्नसराईच्या दिवसांत, जेव्हा आपल्याला आरामदायक आणि त्याच वेळी फॅशनेबल दिसायचे असते, तेव्हा ब्लाऊजच्या बाह्यांचे डिझाईन आपल्यासाठी अधिक आकर्षक ठरू शकतात. (Blouse sleeve fashion trends 2026)

योग्य स्लीव्ह डिझाईन निवडून आपल्या साध्या कॉटन साडीलाही एक 'रॉयल' लूक देऊ शकता. ऑफिसमधील फॉर्मल मीटिंग असो किंवा जवळच्या नातेवाईकांचे लग्न, प्रत्येक प्रसंगासाठी ब्लाऊजच्या बाह्यांचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. पाहूयात काही ट्रेडिंग बाह्यांचे ब्लाऊज डिझाइन्स. (Traditional vs modern blouse sleeve styles)

डोरी नेकलाईनप्रमाणेच डोरी असलेल्या बाह्यासुद्धा दिसायला अतिशय स्टायलिश आणि आकर्षक दिसतात. उन्हाळ्याच्या दिवसांसाठी तर असे डिझाईन्स एकदम परफेक्ट आहेत. आपण या पद्धतीचे डिझाइन्स शिवू शकतो.

उन्हाळ्यामध्ये रोजच्या वापरासाठी पफ स्लीव्ह्ज डिझाईन अगदी परफेक्ट आहे. यामध्ये लेसचे (Lace) अतिशय सुंदर वर्क केलेले असते, ज्यामुळे साध्या बाह्यांना एक अतिशय मोहक आणि 'एलिगंट' लूक मिळतो.

आपल्या ब्लाऊजला हटके आणि स्टायलिश लूक द्यायचा असेल तर फ्लॉवर डिझाइन ट्राय करा. हे दिसायला सुंदर आणि मोहर दिसते. रोजच्या साध्या साड्यांना यामुळे फॅन्सी लूक मिळतो.

हल्ली कट वर्क आणि फ्रिलचे कॉम्बिनेशन खूप ट्रेंडमध्ये आहे. जर आपली साडी प्लेन असेल, तर बाह्यांवर अशा प्रकारचे डिझाईन करून आपण सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकतो. उन्हाळ्यासाठी हे डिझाईन दिसायला जितकं फॅन्सी आहे, तितकंच वापरायला सुटसुटीत आहे.

लीफ शेप ब्लाऊज बाह्या दिसायला अतिशय फॅन्सी आणि आकर्षक आहेत. यामध्ये आपण मॅचिंग मणी आणि अतिशय सुंदर डिटेलिंग करु शकतो. लग्नसराईत साध्या सिल्क साडीला 'रॉयल लूक' देण्यासाठी हे डिझाईन चांगले आहे.

डबल लेयर झालरच्या बाह्यांचे डिझाईन अगदी लेटेस्ट आहे. जर आपण काहीतरी 'युनिक' (हटके) पॅटर्न शोधत असाल, तर हा पर्याय चांगला आहे.

हाफ स्लीव्हज शिवण्याचा विचार करत असाल तर हे डिझाईन आपण एकदा नक्कीच ट्राय करु शकतो. यावर पर्ल डिटेलिंगमुळे या बाह्यांचा लूक अधिकच देखणा आणि आकर्षक दिसतो.