वर्षभराची डाळ साठवून ठेवताना लक्षात ठेवा २ सोप्या टिप्स- डाळींमध्ये कधीच किडे होणार नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2026 16:29 IST2026-04-15T16:24:36+5:302026-04-15T16:29:27+5:30

उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक घरांमध्ये वर्षभरासाठी लागणारे डाळ, तांदूळ भरून ठेवले जातात. त्यात किडे होऊ नयेत म्हणून काळजी घेतली जाते.

पण तरीही बऱ्याचदा असं होतं की डाळींमध्ये, धान्यांमध्ये किडे दिसू लागतात. हे टाळायचं असेल आणि डाळींमध्ये किडे होऊ द्यायचे नसतील तर काय करावं ते पाहुया...

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डाळ भरण्यापुर्वी त्या डब्याच्या तळाशी मीठ टाकून ठेवा. तसेच डाळ भरल्यानंतरही सगळ्यात वर मीठ घाला. मिठामुळे डाळीला किडे होणार नाहीत.

दुसरा एक सोपा उपाय म्हणजे हळद. आपल्याला माहितीच आहे की हळदीमध्ये ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल घटक असतात. म्हणूनच हळदीचा वापर करूनही धान्य जास्तीतजास्त दिवस टिकवता येतं.

डाळीच्या डब्यात थोडी हळद घालून ठेवल्यास किडे होत नाहीत. एकदा हा सोपा प्रयोग करून पाहा. डाळ वर्षांनुवर्षे चांगली राहील.

















