चेहऱ्याला लावा 'हे' रंगबिरंगी घरगुती स्क्रब- विकतच्या फेसमास्कची गरजच नाही, त्वचा नेहमीच चमकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2026 09:45 IST2026-04-16T09:41:22+5:302026-04-16T09:45:01+5:30

त्वचेवरचा ग्लो कमी झाला असेल किंवा डेडस्किन, टॅनिंगचं प्रमाण वाढलं असेल तर नेहमीच विकतचे स्क्रब किंवा फेसमास्क लावण्याऐवजी चेहऱ्याला पुढे सांगितलेले काही घरगुती स्क्रब लावून पाहा. त्वचेवर छान ग्लो येईल.

त्यापैकी पहिला आहे पपई स्क्रब. यासाठी थोडी पपई घ्या आणि ती मॅश करा. त्यामध्ये १ चमचा मध आणि १ चमचा कॉफी पावडर मिसळा. हा लेप चेहऱ्याला लावा आणि मसाज करा. त्यानंतर १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. त्वचेमध्ये छान फरक दिसून येईल.

दुसरं आहे केळीचं स्क्रब. केळी देखील त्वचेेसाठी अतिशय उपयुक्त ठरते. केळीचा स्क्रब तयार करण्यासाठी पिकलेलं केळ घेऊन ते मॅश करा. त्यामध्ये १ चमचा साखर घालून ते चेहऱ्याला लावा आणि हलक्या हाताने मालिश करा. डेडस्किन, टॅनिंग जाऊन त्वचेवर छान चमक येईल.

चिंचेचा कोळ, दही आणि मध हा स्क्रब चेहऱ्याला नियमितपणे लावल्यास पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते.

संत्रीच्या फोडीवर थोडी पिठीसाखर घालून ती फोड चेहऱ्यावर चोळा. यामुळेही त्वचा स्वच्छ होण्यास मदत होईल.

काकडीच्या फोडीवर चिमूटभर हळद, थोडंसं बेसन आणि चमचाभर मध घाला आणि ती फोड चेहऱ्यावर चोळा. त्वचा मऊ, हायड्रेटेड आणि स्वच्छ होईल.