ब्रह्मपुत्र नदीवर बांधण्यात आलाय देशातील सर्वात मोठा रिव्हर रोपवे, अशी आहेत खास वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 10:42 PM2020-08-24T22:42:31+5:302020-08-24T22:47:47+5:30

आसामची राजधानी असलेल्या गुवाहाटीमध्ये ब्रह्मपुत्र नदीच्या दोन किनाऱ्यांना जोडणाऱ्या रिव्हर रोपवेचे लोकार्पण करण्यात आले आहे.

गुवाहाटीमध्ये सोमवारी देशातील हा सर्वात मोठा रिव्हर रोप वे देशाला अर्पित करण्यात आला.

हा रोपवे ब्रह्मपुत्र नदीवरील दोन किनाऱ्यांना एकमेकांशी जोडणार आहे.

या रोप वेच्या बांधणीसाठी ५६ कोटी रुपये खर्च आला आहे. हा रोप वे सुमारे १.८ किमी लांबीचा आहे.

या रोपवेमुले उत्तर गुवाहाटी आणि शहराचया मध्य भागातील प्रवासाच्या वेळेत मोठी घट होऊन ती केवळ ८ मिनिटांवर आली आहे.

आसामचे वित्त आणि आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी रोप वेचे उदघाटन झाल्यानंतर या रोपवेमुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळण्यासोबतच प्रवासही सोपा होईल, असे सांगितले.

२००३ पासून या रोपवेच्या कामास सुरुवात झाली होती. या रोपवेच्या एका केबिनमधून ३० प्रवासी प्रवास करू शकतात.