'गोविंदा रे गोपाला, यशोदेचा नंदलाला'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 04:43 PM2018-09-03T16:43:20+5:302018-09-03T17:01:04+5:30

देशभरात मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी करण्यात येत आहे. गावांपासून ते मुंबईपर्यंत सर्वत्र गोविंदांची धूम पाहायला मिळत आहे

मुंबईत मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. मुंबईतील उंचच-उंच थर पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली आहे.

उंचच उंच मनोर रचून प्रत्येक दहीहंडी मंडळ आपली कलाबाजी अन् कसरत दाखवत आहे.

मुंबईची दहीहंडी असावी अन् सेलिब्रिट नसावेत हे कसं शक्यय. मुंबईच्या दहीहंडीत बिग बॉस विजेती मेधा धाडे अन् महेश मांजरेकर यांची उपस्थिती.

मुंबईत दहीहंडी उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे, मनोरे रचून गोविंदा हंडी फोडण्यासाठी थर रचत आहे. मुंबईत 12 गोविंदा जखमी झाल्याची माहिती आहे.

दहीहंडी उत्सवात विविध ढोल-जहाँज पथके आणि हंडी फोडण्यासाठी मंडळांनी सहभाग घेतला आहे.

दहीहंडी पथकातही कुठं छत्रपती शिवाजी महाराज तर कुठे तिरंगा ध्वज फडकत आहे, हंडी फोडण्याची उत्साह गोविंदांसह प्रत्येक नागरिकांमध्येही जाणवतोय.

दिग्दर्शक फराह खान यांनी आपली मुलगी दिवा हिचा राधाप्रमाणे लूक केला आहे. फराह यांची राधा ही बावरी...

आपल्या चिमुकल्या गोविंदाला शाळेत घेऊन जाताना मुस्लीम दाम्पत्य, ना हिंदुंचा ना मुस्लीमचा हा सोहळा भारतीय उत्सवाचा