जगातील सगळ्यात लांब प्लॅटफॉर्मच्या यादीत भारताचा डंका, ७ पैकी ६ भारताचे; फक्त एकच परदेशी नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 12:54 IST2026-04-16T12:38:02+5:302026-04-16T12:54:35+5:30
Longest Railway Platforms : आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, जगातील सगळ्यात लांब प्लॅटफॉर्म बाबतीत भारत खूप पुढे आहे आणि टॉप ७ मध्ये भारतासोबत केवळ एकाच देशाचं नाव आहे.

Longest Railway Platforms : भारतीय रेल्वे जगातील सगळ्यात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. भारताचं रेल्वे नेटवर्क जगातील चौथं सगळ्यात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. भारतातील अनेक रेल्वे स्टेशन हे आपल्या भव्यतेसाठी आणि लांब प्लॅटफॉर्मसाठी ओळखले जातात. आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, सगळ्यात लांब प्लॅटफॉर्म बाबतीत भारत खूप पुढे आहे आणि टॉप ७ मध्ये भारतासोबत केवळ एकाच देशाचं नाव आहे.

हुबळी जंक्शन रेल्वे स्टेशन हे एक मोठं स्टेशन आहे. या स्टेशनवरील प्लॅटफॉर्मची लांबी साधारण १,५०७ मीटर इतकी आहे. हा जगातील सगळ्यात लांब प्लॅटफॉर्म आहे.

कोल्लम जंक्शन रेल्वे स्टेशन जवळपास १,१८० मीटरमध्ये पसरलेलं आहे. याच कारणाने हे स्टेशन सुद्धा जगातील सगळ्यात लांब प्लॅटफॉर्मपैकी एक आहे.

खडगपूर जंक्शन रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मची लांबी १,०७२ मीटर आहे. आधी हा प्लॅटफॉर्म सगळ्यात लांब होता. आता चौथ्या नंबरवर आलाय.

सगळ्यात लांब प्लॅटफॉर्ममध्ये भारत वरचढ असलेल्या या यादीत एकच परदेशी नाव आहे. ते म्हणजे अमेरिकेच्या शिकागोतील स्ट्रीट सबवे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म. या प्लॅटफॉर्मची लांबी जवळपास १,०६७ मीटर इतकी आहे. हे स्टेशन आपल्या अंडरग्राउंड सिस्टीमसाठीही सुद्धा ओळखलं जातं.

विलासपूर जंक्शन रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म जवळपास १,०५५ मीटर लांब आहे. हा देशातील सगळ्यात लांब प्लॅटफॉर्मपैकी एक आहे.

तर झांसी जंक्शन रेल्वे स्टेशन आपल्या लोकेशनसाठी आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ओळखलं जातं. येथील प्लॅटफॉर्मची लांबी १,०५० मीटर इतकी आहे.

















