१ गॅलन कच्च्या तेलातून किती निघतं पेट्रोल-डिझेल? पाहा कसं असतं कच्च्या तेलाचं नेमकं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 15:11 IST2026-04-22T13:57:15+5:302026-04-22T15:11:16+5:30

Crude Oil Facts : एक गॅलन कच्च्या तेलातून आपल्याला किती पेट्रोल आणि डिझेल मिळतं हे पाहणार आहोत. कच्च्या तेलापासून पेट्रोल, डिझेल, गॅस कसा तयार होतो, त्याची पूर्ण प्रक्रिया कशी होते हेही समजून घेऊया.

Crude Oil Facts : इराण, अमेरिका आणि इस्त्राइल यांच्यात युद्ध सुरू झालं आणि कधी नव्हे ते कच्च्या तेलाबाबत मोठी चर्चा सुरू झाली. कच्चं तेल हा महत्वाचा मुद्दा आहेच, पण त्यावर फक्त पेट्रोल किंवा डिझेलच्या किंमती वाढल्यावर बोललं जातं. पण आता कच्चं तेल जमिनीखाली कसं तयार होतं, किती दिवसांनी तयार होतं आणि ते आपल्यापर्यंत कसं पोहोचतं? असे प्रश्न लोकांना पडू लागले आहेत. अशात आज आपण पाहणार आहोत की, एक गॅलन कच्च्या तेलातून आपल्याला किती पेट्रोल आणि डिझेल मिळतं हे पाहणार आहोत. कच्च्या तेलापासून पेट्रोल, डिझेल, गॅस कसा तयार होतो, त्याची पूर्ण प्रक्रिया कशी होते हेही समजून घेऊया.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची खरेदी-विक्री लीटरमध्ये नाही तर गॅलन आणि बॅरलच्या स्वरूपात होते. एका गॅलन म्हणजे अमेरिकेच्या हिशोबाने जवळपास ३.७८५ लीटर. जर पण बॅरलचा विचार केला तर ते गॅलनपेक्षा खूप जास्त असतं. एका बॅरलमध्ये साधारण ४२ गॅलन कच्चं तेल येतं, ज्याला लीटरमध्ये मोजलं तर ते साधारण १५९ लीटर इतकं होतं.

जेव्हा रिफायनरीमध्ये एक गॅलन म्हणजे साधारण ३.७८५ लीटर कच्चं तेल प्रक्रियेसाठी पोहोचतं तेव्हा ते वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये विभागलं जातं. रिफायनिंगनंतर आपल्याला एका गॅलनमधून सरासरी ०.४५ गॅलन म्हणजे साधारण १.७ लीटर पेट्रोल आणि साधारण ०.२५ गॅलन म्हणजे १ लीटर डिझेल मिळतं. बाकी शिल्लक राहिलेल्या भागातून जेट फ्यूल, एस्फाल्ट म्हणजे डांबर आणि इतर पेट्रोकेमिकल्स तयार केले जातात. प्रति १०० लीटर कच्च्या तेलाबाबत सांगायचं तर यापासून साधारण ४५ ते ५० लीटर पेट्रोल आणि २५ ते ३० लीटर डिझेल मिळतं.

जर आपण ४२ गॅलन असलेल्या पूर्ण बॅरलबाबत सांगायचं तर यात एकूण १५९ लीटर कच्चं तेल मिळतं. रिफायनिंगनंतर यातून साधारण १९ ते २० गॅलन म्हणजे ७० ते ७५ लीटर पेट्रोल मिळतं. तेच डिझेल आणि डिस्टिलेटचा भाग ११ ते १३ गॅलन म्हणजे ४० ते ४५ लीटरच्या आसपास होतो.

लोक नेहमीच विचार करतात की, सीएनजी म्हणजे कम्प्रेस्ड नॅचरल गॅसही क्रूड रिफायनिंगचं उत्पादन असतो. पण हे सत्य नाही. सीएनजी गॅस थेट कच्च्या तेलापासून तयार होत नाही. सीएनजीचा मुख्य सोर्स जमिनीखालील नैसर्गिक गॅस आहे.

हा मु्ख्यपणे मीथेन गॅस आहे जो तेल रिफायनरीच्या प्रक्रियेतून वेगळा केला जातो. त्यामुळे क्रूड ऑइल आणि सीएनजीचा कोणताही थेट संबंध नाही. कच्चं तेल मुळात घट्ट आणि अशुद्ध असतं. रिफायनरीत ते उच्च तापमानावर गरम केलं जातं, ज्यानंतर पेट्रोल, डिझेल, केरोसिन आणि इतर गोष्टी वेगळ्या केल्या जातात.