हिमालय नव्हे या आहेत जगातील सर्वात लांब पर्वतरांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 03:45 PM2020-02-03T15:45:42+5:302020-02-03T16:08:31+5:30

जगातील सर्वात मोठा पर्वत म्हटला की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो हिमालय पर्वत. मात्र जगभरातील सर्वात लांब पसरलेल्या पर्वतरांगाचा विचार केल्यास त्यामध्ये इतर अनेक पर्वत असल्याचे दिसून येते. आज आपण जगातील सर्वात लांब पर्वतरांगांविषयी जाणून घेऊयात.

ताजिकिस्तानमधील पामीर पर्वत हा जगातील सर्वात लांब पर्वतरांगांपैकी एक आहे. त्याची लांबी सुमारे 300 किमी आहे.

भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीन या भागात पसरलेली काराकोरम पर्वत रांग सुमारे 500 किमी लांब आहे.

अमेरिकेतील अलास्का पर्वतरांगेचाही जगातील सर्वात लांब पर्वतरांगांमध्ये समावेश आहे. त्याची लांबी 650 किमी आहे.

अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन आणि ताजिकिस्तान या देशांमध्ये पसरलेल्या हिंदुकुश पर्वताची लांबी 950 किमी आहे.

रशिया, जॉर्जिया, अर्मेनिया आणि अझरबैझान या देशात पसरलेला कॉकेशस पर्वत 1100 किमी लांब आहे.

युरोपमधील आल्प्स पर्वतरांग सुमारे 12 किमी लांबीची आहे.

कझाकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान या देशांमध्ये पसरलेली तियेन शान पर्वतरांग 13 किमी लांबीची आहे.

भारताच्या उत्तर सीमेवर असलेली हिमालयन पर्वतरांग 2 हजार 400 किमी लांब आहे. हिमालय भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान आणि चीन या देशांमधून पसरलेला आहे.

अल्जेरिया, ट्युनिशिया आणि मोरक्को या देशांमध्ये पसरलेला अॅटलस पर्वत सुमारे 2500 किमी लांब आहे.

रशिया आणि कझाकिस्तानदरम्यान पसरलेली उरल पर्वतरांग सुमारे 2500 किमी लांब आहे.

चीनमधील कुनलून पर्वतरांग 3 हजार किमी लांब आहे.

दक्षिण धृवावर असलेल्या अंटार्क्टिका खंडातील ट्रान्स अंटार्क्टिक पर्वतरांग ही सुमारे 3500 किमी लांब आहे.

ऑस्ट्रेलियातील ग्रेट डिव्हायडिंग पर्वतरांग ही 3500 किमी लांब आहे.

अमेरिका आणि कॅनडामध्ये पसरलेली रॉकी पर्वतरांग ही तब्बल 4800 किमी लांब आहे.

दक्षिण अमेरिका खंडातील अँडिज पर्वतरांग ही जगातील सर्वात मोठी पर्वतरांग आहे. ही पर्वतरांग सुमारे 7 हजार किमी लांब आहे.