Coronavirus: आनंदाची बातमी! कोरोना रुग्ण अवघ्या १२ तासांत बरे; डॉक्टरांना मिळालं ‘गेमचेंजर’ औषध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 08:27 AM2021-06-10T08:27:41+5:302021-06-10T08:32:40+5:30

Monoclonal antibody: जगावर कोरोनाचं संकट आल्यापासून अनेक वैज्ञानिक या आजारावर औषध शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अद्याप ठोस औषधं निघालं नाही. मात्र २ आठवड्यापूर्वी लॉन्च झालेले औषध कोविड रुग्णांवर उपचारासाठी फायदेशीर ठरत असल्याचं चित्र समोर आलं आहे.

कोरोना व्हायरस(Coronavirus) संक्रमणापासून वाचण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक दिवसरात्रं मेहनत घेत संशोधन करत आहे. कोरोनावर काही देशांनी लस निर्माण केली आहे. परंतु अद्याप कोणतंही औषधं थेट कोरोनावर उपचारासाठी तयार झालं नाही.

कोरोनाचं संकट लोकांच्यावर असताना यात एक दिलासादायक रिपोर्ट समोर आला आहे. कोरोना उपचारावर रोज एक नवीन रिपोर्ट समोर येत असतो. यात आता कोरोनावर उपचारात फायदेशीर ठरणारी मोनोक्लोनल एंटीबॉडी थेरेपी(Monoclonal Antibody Therapy) चा वापर भारताने सुरू केला आहे.

मोनोक्लोनल एंटीबॉडी थेरेपी(Monoclonal Antibody Therapy) चा वापर केल्यानं सुखद निष्कर्ष समोर आला आहे. दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी कोरोना रुग्णांवर मोनोक्लोनल एंटीबॉडी थेरेपीचा वापर केला. या डॉक्टरांनी जो परिणाम पाहिला तो सर्वांसाठी आनंदाची बातमी घेऊन येणारा होता.

मोनोक्लोनल एंटीबॉडी थेरेपी(Monoclonal Antibody Therapy for Covid 19 Patient) चा वापर ज्या कोविड रुग्णांवर केला त्या दोन रुग्णांची तब्येतीत १२ तासांत सुधारणा झाल्याचं दिसून आलं. सर गंगाराम हॉस्पिटलच्या मेडिकल डिपार्टमेंटच्या सीनियर कंन्सल्टेंट डॉक्टर पूजा खोसला यांनी याबाबत माहिती दिली.

त्या म्हणाल्या की, ३६ वर्षीय एका आरोग्य कर्मचाऱ्याला अतिताप, खोकला, अंगदुखी आणि थकवा जाणवत होता. तसेच शरीरात पांढऱ्या पेशी कमी होत चालल्या होत्या. मंगळवारी म्हणजे आजाराच्या सहाव्या दिवशी त्यांना मोनोक्लोनल एंटीबॉडी कॉकटेल देण्यात आलं होतं.

असे लक्षण जाणवणारे रुग्ण Moderate ते गंभीर स्थितीत वेगाने पोहचतात. या रुग्णाला ५ दिवसापर्यंत अतिताप होता. शरीरातील पांढऱ्या पेशीची पातळी २६०० पर्यंत आली होती. त्यानंतर सहाव्या दिवशी आम्ही त्यांना मोनोक्लोनल एंटीबॉडी थेरेपी दिली.

या थेरेपीनंतर ८ तासांतच रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. त्यानंतर १२ तासानं रुग्णाला हॉस्पिटलमधून डिस्चार्जही देण्यात आला अशी माहिती डॉक्टर पूजा खोसला यांनी दिली. मोनोक्लोनल एंटीबॉडी..जी विशिष्ट एंटिजनला टार्गेट करतं.

या उपचाराचा वापर पहिल्यांदा इबोला आणि एचआयव्हीसाठी करण्यात आला होता. तर दुसरा रुग्ण ८० वर्षीय आर के राजदानवर मोनोक्लोनल एंटीबॉडी थेरेपीचा वापर केला. त्यांना डायबेटिस(Diabetes) आणि हाय ब्लड प्रेशरचा आजार होता.

आर के राजदान यांना अतिताप आणि खोकला झाला होता. हॉस्पिटलनं सांगितलं की, जेव्हा सीटी स्कॅन केले तेव्हा शरीरात सौम्य तापाची पुष्टी झाली. पाचव्या दिवशी त्यांना REGN COV2 देण्यात आलं. रुग्णाची तब्येत १२ तासाच्या आत सुधारली.

डॉक्टर खोसला यांनी सांगितले की, जर योग्यवेळी मोनोक्लोनल एंटीबॉडी थेरेपीचा वापर केला तर त्याचा परिणाम उपचारात मोठा फायदेशीर ठरतो. या उपचारामुळे जास्त धोका असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी त्यांची तब्येत ढासळण्यापासून वाचवू शकतो.

तर स्टेरॉयड या इम्यूनोमॉड्युलेशनचा वापर कमीत कमी करता येईल. त्यामुळे म्यूकरमायकोसिस आणि ब्लॅक फंगससारख्या संक्रमणाचा धोकाही टाळता येऊ शकतो. हार्ट निगडीत आजार असलेल्या कोविड १९ च्या रुग्णांवर मोनोक्लोनल एंटीबॉडी थेरेपीचा वापर केला गेला. ज्यानं १ आठवड्यात या रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.