Makar Sankranti Special : 'या' पारंपरिक पदार्थांसोबत मकरसंक्रांत करा गोड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 12:25 PM2020-01-14T12:25:08+5:302020-01-14T12:31:46+5:30

नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरचा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. या दिवशी मनातील सर्व राग रूसवे दूर करून तिळगुळाने सर्वांचं तोंड गोड करतात. मोठ्या उत्साहात भारतात मकरसंक्रांत हा सण साजरा केला जातो.

मकरसंक्रांत या सणाला घरामध्ये खास पारंपरिक पदार्थ केले जातात. अशाच काही पदार्थांविषयी जाणून घेऊया.

मकरसंक्रांतीसाठी घरोघरी तिळाचे लाडू तयार केले जातात. तीळ शरीराला उष्णता देण्यासाठी फायदेशीर ठरतात.

पुरणपोळी हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. सणासुदीला, नैवेद्याच्या स्वयंपाकात हमखास पुरणपोळी केली जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पुरणपोळी तयार केली जाते.

गूळ, तीळ, भाजणीचे चण्याचे पीठ, वेलची पावडर, दाण्याचा कुट, खसखस, खोबरे वापरून गुळपोळी तयार केली जाते. गुळपोळी हा पौष्टीक पदार्थ चिमुकल्यांना अतिशय आवडतो.

गुजरातमध्ये मकरसंक्रांतीच्या निमित्ताने उंधियो बनवला जातो. विविध भाज्यांचा वापर करून ही डिश तयार केली जाते.

मकरसंक्रांतीसाठी प्रत्येक बंगाली कुटुंबात पातिशप्ता हा पारंपरिक पदार्थ तयार केला जातो. मैदा, गहू किंवा तांदळाचं पीठ, गुळ, नारळ, दूध यासह अन्य काही पदार्थ वापरून पातिशप्ता हा गोड पदार्थ तयार केला जातो.

पंजाबमध्ये मकरसंक्रांतीला उसाच्या रसाची खीर केली जाते. पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती होते.

भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने दही-चूरा ही पारंपरिक डिश तयार केली जाते.

उत्तराखंडमधील कुमाऊंनीमध्ये मकरसंक्रांतीच्या निमित्ताने घुंघूटे हा खास पदार्थ तयार केला जातो. वेगवेगळ्या आकारात गव्हाचं पीठ आणि गुळापासून हा पदार्थ तयार केला जातो.

मकरसंक्रांतीला शेंगदाणे, गूळ आणि तूप यांपासून शेंगदाण्याची चिक्की तयार केली जाते. शेंगदाण्याच्या चिक्कीमध्ये प्रोटीन्स आणि इतर पोषक घटक भरपूर प्रमाणात असल्याने ती शरीरासाठी उपयुक्त असतं.

कांगसुबी हा खास पदार्थ मणिपुरमध्ये मकरसंक्रांतीला तयार केला जातो. तीळ आणि उसाच्या रसाने हा पदार्थ तयार करतात.