'आम्हाला रात्री घेऊन जातात अन्...'; तुरुंगातील कैदी महिलेने सांगितला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 06:52 PM2020-05-21T18:52:54+5:302020-05-21T19:01:38+5:30

जगभरात कोरोनाचा व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरात आतापर्यत ५१ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यत ३ लाख २९ हजाराहूंन अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र एकीकडे देश कोरोनासारख्या महामारीचा एकजूटीने सामना करत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पाकिस्तानच्या लाहोरमधील एका तुरुंगातील धक्कादायक प्रकार कैदी महिलेने समोर आणला आहे. तुरुंगातील कैदी महिलांना रात्र झाल्यावर अधिकाऱ्यांकडे घेऊन जातात आणि त्यांना जबरदस्ती खूश करायला सांगतात, असा आरोप संबंधित महिलेने केला आहे.

पाकिस्तानमधील एका वृत्तानूसार, संबंधित महिलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या महिलेने लाहोर जिल्हा कारागृहात तुरूंगात असल्याचे सांगितले.

तसेच एखादी महिला गर्भपती झाल्यास तिचा गर्भपात देखील करण्यात येतो असा आरोपही करण्यात आला आहे. तसेच या सर्व प्रकरणाची तक्रार आम्ही डीआयजीकडे केली आहे. मात्र देखील या सर्व प्रकरणावर कारवाई करत नाही, असं पीडित महिलेने सांगितले.

या तुरुंगात अनेक महिलांवर लैंगिक छळ होत असल्याचा आरोप केला आहे. कैदी महिलांना रात्र झाल्यावर अधिकाऱ्यांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगतात, असं संबंधित महिलेने सांगितले.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तुरुंगात येऊन पाहणी करावी, अशी विनंती देखील पीडित महिलेकडून करण्यात आली आहे.