मुंबईत खळबळ! महिलेचे लैंगिक शोषण करून गळा चिरून हत्या; नाल्यात आढळला मृतदेह 

Published: May 12, 2021 05:48 PM2021-05-12T17:48:27+5:302021-05-12T18:14:30+5:30

Rape And Murder :मुंबईतील वांद्रे कुर्ला परिसरात एका महिलेवर बलात्कार करून गळा चिरून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स (बीकेसी) परिसरात असणाऱ्या एमटीएनएल जंक्शनजवळ संबंधित महिलेचा मृतदेह आढळला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे.

पोलिसांना प्राथमिक तपासात महिलेची निर्घृण हत्या केल्याचे प्रकरण वाटले. मात्र वैद्यकीय तपासणीत धक्कादायक खुलासा झाला आहे. याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास केला जात आहे.

मंगळवारी सकाळी वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स येथील एमटीएनएल जंक्शनजवळच्या नाल्यात एका महिलेचा मृतदेह आढळला होता. सर्वप्रथम परिसरात राहाणाऱ्या स्थानिकांनी हा मृतदेह पाहिला आणि याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली.

संबंधित महिलेच्या  गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आलं होतं. मात्र मृत महिलेच्या गुप्तांगात जखमा झाल्याचं वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी बीकेसी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बीकेसी पोलीस घटनास्थळाचा आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. जेणेकरून मृतदेह नाल्यात कोणी फेकला याबाबत काही माहिती मिळू शकेल. 

याप्रकरणी अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केलं आहे. अद्याप पोलिसांच्या हाती कोणताही पुरावा लागला नाही. पण परिसरातील सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचं काम पोलिसांकडून केलं जात आहे.

मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

दरम्यान, पोलिसांनी आरोपी हा एकतर प्रियकर किंवा आर्थिक चणचणीतून हत्या करणारी व्यक्ती असू शकते.

बीकेसी पोलिसांनी या गुन्ह्याच्या शोध घेण्यासाठी आणि तपासात कोणतेही धागेदोरे शोधण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे, ज्यामुळे आरोपींचा शोध घेण्यात मदत होईल.