Airtel नं दिलं New Year गिफ्ट; 'या' Prepaid Plans वर मिळतोय डिस्काऊंट आणि अन्य फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 09:49 AM2021-12-30T09:49:20+5:302021-12-30T09:58:21+5:30

Airtel Prepaid Plans : काही दिवसांपूर्वी जवळपास सर्वच दूरसंचार कंपन्यांनी (Telecom Companies) त्यांचे प्रीपेड प्लॅन्सचे (Prepaid Plans) दर वाढवले ​​आहेत.

Airtel Prepaid Plans : काही दिवसांपूर्वी जवळपास सर्वच दूरसंचार कंपन्यांनी (Telecom Companies) त्यांचे प्रीपेड प्लॅन्सचे (Prepaid Plans) दर वाढवले ​​आहेत. नवीन किमती लागू होऊन जवळपास एक महिना झाला आहे, परंतु ते ग्राहकांमध्ये अजूनही गोंधळाचं वातावरण आहे.

अनेक ग्राहक आजही कमी किंमतीतील प्रीपेड प्लॅन्स पाहत आहेत. जर तुम्हीही महागड्या प्लॅन्सने हैराण असाल तर आज आम्ही अशाच काही प्लान्सबद्दल सांगत आहोत, जे सध्या डिस्काउंट कूपनसह मिळत आहेत.

देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेल आपल्या काही प्रीपेड प्लॅनवर ५० रुपयांची सूट देत आहे. परंतु ही सवलत फक्त एअरटेल थँक्स अॅप (Airtel Thanks App) वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. एअरटेल अॅपद्वारे प्लॅन्स सबस्क्राईब करणाऱ्यांना कंपनी अतिरिक्त डेटा कूपन देखील ऑफर करते.

एअरटेलचा ३५९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन बेसिक प्रीपेड प्लॅन म्हणून गणला जाऊ शकतो. यामध्ये कंपनी दररोज २ GB डेटा तसेच अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज १०० SMS ऑफर करते.

एअरटेल थँक्स अॅपद्वारे हा प्लॅन रिचार्ज केल्यास, हा प्लॅन ३०९ रुपयांना मिळतो. तसंच हा अतिरिक्त २ GB डेटासह येतो. हे डेटा कूपन वापरकर्ते त्यांच्या वैधतेदरम्यान कधीही रिडीम करू शकतात.

एअरटेलचा आणखी एक प्रीपेड प्लॅन जो ५० रुपयांच्या डिस्काउंट ऑफरसह येतो तो म्हणजे ५९९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन. हा प्लॅन Disney+ Hotstar Mobile अॅक्सेसह येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, दररोज ३ GB डेटा सह येतो. या प्लॅनची वैधता २८ दिवसांती आहे. डिस्काउंट कूपनचा वापर केल्यानंतर हा प्लॅन ५४९ रुपयांना मिळतो.

याशिवाय एअरटेल आणखी एक ५४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅनही ऑफर करत आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, २ GB डेटा आणि ५६ दिवसांची वैधता मिळते. तसंच यासोबत दररोज १०० एसएमएसदेखील देण्यात येतात. याशिवाय यासह ४ GB चं डेटा कूपनही मिळतं.

एअरटेलने गेल्या आठवड्यात ६६६ रुपयांचा प्रीपेड प्लान लॉन्च केला होता. या प्रीपेड प्लॅनमध्ये ७७ दिवसांच्या वैधतेसाठी दररोज १.५GB डेटा, अमर्यादित कॉल आणि १०० एसएमएस दररोज दिले जातात.

या प्लॅनच्या अतिरिक्त फायद्यांमध्ये प्राइम व्हिडीओ मोबाइल एडिशन, अपोलो २४/७ सर्कल, शॉ अकादमीसह मोफत ऑनलाइन कोर्स, फास्टॅगवर १०० रुपये कॅशबॅक, मोफत हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिक यांचा समावेश आहे.

एअरटेल ही एकमात्र अशी कंपनी आहे, जी ६९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह ५६ दिवसांसाठी अॅमेझॉन प्राईम मेंबरशिप देत आहे. यामध्ये दररोज ३ GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएसही देण्यात येतात. याशिवाय अपोलो २४/७ सर्कल, शॉ अकादमीसह मोफत ऑनलाइन कोर्स, फास्टॅगवर १०० रुपये कॅशबॅक, मोफत हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिक यांचादेखील यात समावेश आहे.