नाशिक जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्येच्या प्रमाणात अल्पशी वाढ दिसून येत असताना पेठ तालुका गत महिन्याप्रमाणेच पुन्हा एकदा कोरोनामुक्त झाला आहे, तर सुरगाण्यात केवळ एकमेव रुग्णाची नोंद असून जिल्ह्याच्या दृष्टीने ही मोठी दिलासादायक बाब आहे. ...
नाशिक शहर व परिसरात थंडीचा कडाका आता पुन्हा वाढू लागला आहे. शहराच्या किमान तापमानाचा पारा गुरुवारी (दि.२६) १४.३ अंशांपर्यंत घसरला. पहाटेच्या सुमारास शहरात धुक्याची चादर पसरत आहे. ...
देवळाली कॅम्प येथील सह्याद्रीनगर, चारणवाडीलगत असलेल्या गावंडे मळे परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार होत असल्याने बिबट्याच्या भीतीमुळे या भागातील शेतकरी व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याच्या मागणीची द ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकात येणाऱ्या प्रवाशांची गुरुवारपासून वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात आली असून पहिल्याच दिवशी सायंकाळपर्यंत ६८० प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले. त्यापैकी २१ संशयित रुग्ण आढळले. ...
मराठा आरक्षणाला स्थगितीमुळे रखडलेली अकरावीची प्रवेशप्रक्रिया अखेर गुरुवारपासून (दि.२६) सुरू झाली असून, शहरातील विविध ६० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त १७ हजार ८० जागांसाठी दुसऱ्या फेरीत अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १ डिसेंबरपर्यंत महाविद्यालया ...
कमोदनगर येथील इमारतीच्या सातव्या मजल्यावरून कोसळून नितीन दगडुबा गाडेकर (२०) या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
ओझर येथील वायुसेना स्टेशनला २०१९-२०चे राजभाषा प्रभावी कार्यान्वयनकरिता नगर राजभाषा कार्यान्वयन समिती नाशिकद्वारा राजभाषा शिल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळा व लाल कांद्याची आवक वाढली असून, उन्हाळा कांदा ७००, तर लाल कांदा दरात ४०० रुपयांची घसरण झाली. बाजारभाव कमी झाल्याने कांदा उत्पादकांच्या गोटात संताप व्यक्त केला जात आहे. ...
वाढीव वीजबिल, रेल्वे गेट, अतिक्रमणे हटवू नयेत, नगर परिषदेतील भ्रष्टाचाराची चौकशी, अशा विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा नाशिकचे संजय सानप व त्यांचे कार्यकर्त्यांनी सुरू केलेले आमरण उपोषण तहसीलदारांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घ ...
कळवण- पूनंद प्रकल्पातून जाणाऱ्या सटाणा नगरपालिकेच्या जलवाहिनीची पाइपलाइन काठरे दिगर चौफुली परिसरात फुटल्यामुळे काठरे दिगरचे गुलाब गांगुर्डे या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. याबाबत गांगुर्डे व आदिवासी शेतकऱ्यांनी आमदार नितीन पवार यांच्याकडे तक्रार केल्य ...