सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 17:34 IST2026-04-21T17:31:33+5:302026-04-21T17:34:23+5:30

Satellite Phone : सॅटेलाइट फोन म्हणजे काय आणि भारतात ते वापरण्याबाबतचे नियम काय आहेत?

Different from a normal phone! What exactly is a satellite phone? Carrying it in India can land you in jail | सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल

सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल

आजच्या युगात स्मार्टफोन ही गरज बनली असली, तरी दुर्गम भागात जिथे नेटवर्क नसते, तिथे 'सॅटेलाइट फोन' हे एक अत्यंत प्रभावी साधन मानले जाते. मात्र, हे उपकरण वापरण्याबाबत भारतात अत्यंत कडक नियम आहेत. अनेकदा माहितीअभावी लोक हे तंत्रज्ञान वापरण्याची चूक करतात, ज्यामुळे त्यांना कायदेशीर संकटाचा सामना करावा लागू शकतो. भारतात सॅटेलाइट फोन बाळगणे किंवा वापरणे कायद्याने गुन्हा ठरू शकतो, हे तुम्हाला माहित आहे का?

सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय?

सॅटेलाइट फोन हे सामान्य मोबाइलपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. सामान्य फोन जमिनीवरील मोबाइल टॉवर्सच्या नेटवर्कवर अवलंबून असतात, तर सॅटेलाइट फोन थेट अवकाशात पृथ्वीभोवती फिरणाऱ्या कम्युनिकेशन सॅटेलाइटशी जोडलेले असतात. त्यामुळे डोंगरदऱ्या, घनदाट जंगले, समुद्र किंवा जिथे नेटवर्क पोहोचत नाही अशा ठिकाणीही हे फोन सहज चालतात. म्हणूनच, याचा वापर प्रामुख्याने लष्करी दले, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि समुद्री मोहिमांमध्ये केला जातो.

भारतात सॅटेलाइट फोनवर बंदी का आहे?

भारतात सॅटेलाइट फोन पूर्णपणे बॅन नसले, तरी ते वापरण्यावर कडक सरकारी निर्बंध आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सरकार यावर कडक नियंत्रण ठेवते. याचे मुख्य कारण म्हणजे, सॅटेलाइट फोनचे सिग्नल ट्रॅक करणे सामान्य मोबाइलपेक्षा अधिक कठीण असते. दहशतवादी किंवा देशविरोधी शक्तींकडून याचा गैरवापर होऊ नये, यासाठी सरकार सतर्क असते. भारतात केवळ सरकारची अधिकृत परवानगी असलेल्या सेवांनाच मान्यता देण्यात आली आहे.

कायदेशीर कारवाई आणि शिक्षा

जर तुम्ही सरकारी परवानगीशिवाय सॅटेलाइट फोन बाळगला किंवा वापरला, तर तुमच्यावर 'इंडियन टेलिग्राफ ॲक्ट १८८५' आणि 'इंडियन वायरलेस टेलिग्राफ ॲक्ट १९३३' अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. अशा स्थितीत केवळ दंडच नाही, तर कारावासाची शिक्षाही होऊ शकते. परदेशातून भारतात परतताना अनेकांना सॅटेलाइट फोन सोबत आणण्याची सवय असते, पण अशा वेळी विमानतळावर तुमचे उपकरण जप्त केले जाऊ शकते आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

कोणाला मिळते परवानगी?

सॅटेलाइट फोन वापरण्याचा अधिकार सामान्यतः सरकारी संस्था, संरक्षण दल आणि आपत्ती निवारण यंत्रणांना असतो. काही विशिष्ट परिस्थितीत कंपन्या किंवा व्यक्तींनाही यासाठी परवानगी मिळू शकते, परंतु त्यासाठी कायदेशीर परवाना घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे, जर तुम्हाला खरोखर अशा उपकरणाची गरज असेल, तर नियमांची पूर्ण माहिती घेऊन आणि रीतसर परवानगी घेऊनच त्याचा वापर करणे हिताचे ठरेल.

Web Title : सैटेलाइट फोन: क्या हैं और भारत में अवैध क्यों?

Web Summary : सैटेलाइट फोन सामान्य फोन से अलग उपग्रहों से जुड़ते हैं। भारत सुरक्षा कारणों से इनके उपयोग को प्रतिबंधित करता है। अनधिकृत कब्जे पर कारावास सहित कानूनी कार्रवाई हो सकती है। केवल अधिकृत एजेंसियां ही इनका उपयोग कर सकती हैं।

Web Title : Satellite phones: What are they and why are they illegal?

Web Summary : Satellite phones connect to satellites, unlike regular phones. India restricts their use due to security concerns. Unauthorized possession can lead to legal action, including imprisonment. Only authorized agencies can use them.