विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियावर निवडणूक आयोगाची करडी नजर असणार आहे. उमेदवाराला प्रचारासाठी सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारचा मजकूर पोस्ट करताना जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व संंनियंत्रण समितीची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. ...
एक माणूस आपल्या बैलांना तुतारीने हाकलत जाताना दिसला. गांधीजी अस्वस्थ झाले. आपण कृतीतून प्राण्यांवर दया दाखविणार नाही, मग गोरक्षणाचा उपदेश देऊन उपयोग काय? त्यांनी गाडीवानाला बोलावले आणि नम्रपणे, ‘तुतारी न टोचता बैलांना हाकता येणार नाही का’, असे विचारी ...
सफाई कामगारांना १९३३ च्या त्या काळात सामान्य विहिरीतील पाणी पिण्यास मज्जाव होता. या विरोधात लढा देण्यासाठी महात्मा गांधीजींनी पुढाकार घेतला. रामबाग येथील बोरकरनगर परिसरात विशेष आंदोलन उभे केले. ८ नोव्हेंबर १९३३ रोजी या विहिरीचे त्यांनी लोकार्पण केले. ...
जिल्हा व सत्र न्यायालयातील एक लिफ्ट मंगळवारी पुन्हा जीवावर उठली होती. लिफ्ट मध्येच बंद पडल्यामुळे त्यात तीन वकील व तीन अन्य व्यक्ती असे एकूण सहाजण सुमारे पाऊणतास अडकले होते. ...
विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी जात असलेल्या सारस्वत पब्लिक स्कूल, सावनेरच्या ‘स्कूल व्हॅन’ने अचानक पेट घेतला. घटनेच्या वेळी चालकाव्यतिरिक्त ‘स्कूल व्हॅन’मध्ये कुणीही नसल्याने अनर्थ टळला. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कें द्र शासनाच्या निर्देशानुसार प्लास्टिक निर्मूलनासाठी उद्या बुधवारी २ ऑक्टोबरला महापालिका मुख्यालयासह सर्व दहा झोनमध्ये ‘इंडिया प्लॉग रन’अभियान राबविण्यात येत आहे. ...
भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. परंतु ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्याच कामठी मतदारसंघातून लढणार की काटोलमधून त्यांना पक्ष उभा करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र्र ठाकरे यांनी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनच्या रॅण्डमायझेशन (सरमिसळ) प्रक्रिया सोमवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थि ...