MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 10:10 IST2026-04-23T10:10:18+5:302026-04-23T10:10:58+5:30

प्रथमच्या मित्राने नोकरी सोडून ओला कार चालवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निर्णयाने अनेकांना धक्का बसला. समाजानेही त्याला टोमणे मारले

After MBA, he left his job worth 25 lakhs and started driving Ola car; Earned 6.50 lakhs in 3 years, is it really possible? | MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?

MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?

MBA चा अर्थ मास्टर ऑफ बिझनेस एडमिनिस्ट्रेशन असते, अनेकदा विद्यार्थ्यांकडून पदवीनंतर पोस्ट गॅझ्युएशनसाठी MBA डिग्री घेतली जाते, जेणेकरून त्यांना चांगली नोकरी मिळू शकेल. जे लोक नोकरी करतात ते नोकरीतील प्रगतीसाठी पुढे MBA शिक्षण घेत असतात. परंतु जर कुणी MBA नंतर वार्षिक २५ लाखांची नोकरी केवळ त्यात फारसा रस राहिला नाही म्हणून सोडत असेल तर त्यावर फारसा विश्वास बसणार नाही.

इंटरनेटवर सध्या व्हायरल होणाऱ्या एका पोस्टमध्ये  प्रथम खन्ना (@Portfolio_Bull) नावाच्या एका यूजरने हाच दावा केला आहे. जो गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडिया युजर्सच्या एक्स फीडवर वारंवार दिसत आहे. प्रथमने त्याच्या मित्राबाबत खुलासा केला आहे. दाव्यानुसार, प्रथमने स्वत:ची ओळख २३ वर्षीय इक्विटी गुंतवणूकदार, छंद म्हणून व्यापार करणारा, वित्त आणि इतर विविध गोष्टी पोस्ट करणारा अशी सांगितली आहे. आता त्या माणसाविषयी जाणून घेऊया ज्याने आपली २५ लाख वार्षिक पगाराची नोकरी सोडून ओलासाठी ड्रायव्हिंग सुरू केले. प्रथमने X पोस्टवर मित्राबाबत पोस्ट केली, ज्यात मित्राने टियर २ कॉलेजमधून MBA शिक्षण घेतल्याचे म्हटले. त्याच्या हातात २५ लाख वार्षिक पगाराची नोकरी होती. तरीही तो कायम निराश असायचा. त्यानंतर एकेदिवशी या मित्राने नोकरी सोडण्याचा मोठा निर्णय घेतला.

प्रथमच्या मित्राने नोकरी सोडून ओला कार चालवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निर्णयाने अनेकांना धक्का बसला. समाजानेही त्याला टोमणे मारले. इतके शिक्षण घेऊन बर्बाद केले, काय विचार केला होता आणि काय बनला असं नातेवाईक विचारू लागले. आज प्रथमच्या मित्राकडे ३ वर्षांनंतर १२ कार आहेत. तो महिन्याला ६ लाखांहून अधिक कमाई करतो असं या पोस्टमध्ये लिहिले आहे. सध्याच्या काळात अनेकांची मानसिकता सुरक्षित नोकरी शोधण्याची असते. दुसरीकडे २५ लाख वार्षिक पगाराची नोकरी सोडून ओला ड्रायव्हर बनलेल्या युवकाने ३ वर्षानंतर १२ कार खरेदी केल्या. ज्यातून त्याला महिन्याला ६ लाखाहून अधिक कमाई होते. मात्र या पोस्टबाबत लोकांच्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले. जर ६.५ लाख कमावणारा मित्र असेल, तर त्याबाबत ठोस पुरावे पोस्टसोबत जोडायला हवे होते. ओला अथवा कुठल्याही कॅब मार्केटमध्ये इतकी कमाई सहज सोपी नाही. जसे कुणीही आपला जॉब सोडून मार्केटमध्ये यश मिळवण्याची स्वप्ने पाहतील. जर या पोस्टमध्ये सत्यता असेल तर हा अपवादा‍त्मक असू शकतो. या पोस्टच्या दाव्यावर युजर्स फारसे विश्वास ठेवायला तयार नाहीत. आतापर्यंत ५ लाखाहून अधिक व्ह्यूज या पोस्टला मिळालेत. काहींनी ही कथा कपोलकल्पित असल्याचे म्हटलं आहे. 

लोकांना का वाटतेय शंका?

१२ वाहनांमधून वार्षिक ६.५ लाख रुपयांचा नफा. प्रत्येक कारवर ५५,००० रुपयांची बचत करणे शक्य नाही.  विमा, ड्रायव्हरचा पगार, देखभाल, ऑइल, कर, गाडीचा EMI आणि कारची किंमत - हे सर्व दरवर्षी कमी होते. ३ वर्षांत १२ कार ईएमआयवरसुद्धा घेणे शक्य नाही.

Web Title : MBA स्नातक ने छोड़ी नौकरी, ओला चलाकर लाखों कमाए: क्या यह सच है?

Web Summary : एक वायरल पोस्ट में दावा किया गया है कि एक MBA स्नातक ने अच्छी नौकरी छोड़कर ओला चलाना शुरू किया, अब उसके पास 12 कारें हैं और वह ₹6 लाख मासिक कमाता है। पोस्ट की प्रामाणिकता और कैब उद्योग में इतने अधिक मुनाफे की संभावना पर संदेह है।

Web Title : MBA Graduate Quits High-Paying Job, Drives Ola, Earns Lakhs: Fact?

Web Summary : A viral post claims an MBA graduate left a lucrative job to drive an Ola, now owning 12 cars and earning ₹6 lakhs monthly. Doubts arise regarding the post's authenticity and the feasibility of such high profits in the cab industry.