केंद्र सरकारने ई-पास सेवा रद्द केली असली तरी राज्य शासनाने त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाचे पुढील निर्देश येईपर्यंत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास सक्तीचेच असणार आहे. ...
डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष संजय पाटील यांना व्हॉटस्ॲपवर नुसता मेसेज करताच त्यांनी कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात तातडीने बेड उपलब्ध करून दिला. वेळेत उपचार मिळाल्याने जीवदान मिळाले. ...
उच्च न्यायालयात आरोपीच्या जामीन अर्जावर कॅव्हेट दाखल करून आपली बाजू मांडली नाही, याचाच अर्थ घरफाळा घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांवर कोणाचा तरी दबाव आहे, असा आरोप सनसनाटी आरोप सोमवारी झालेल्या महापालिका सभेत प्रा. जयंत पाटील या ...
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर ऊन-पावसाचा खेळ पाहावयास मिळाला. अधून-मधून जोरदार सरी कोसळायच्या, त्यानंतर ऊन लगेचच ऊन पडायचे. गगनबावड्यात मात्र पावसाची रिपरिप राहिली. धरणातून विसर्गही कमी झाला असून नद्यांची पातळी कमी होऊ लागली आहे. ...
'गाईच्या दूध खरेदीमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांची अक्षरश: पिळवणूक सुरू आहे. उत्पादन खर्चाच्या निम्मा दर त्याच्या हातात पडतोय, त्यासाठी आम्ही राज्यात ठीक-ठिकाणी आंदोलन पुकारले आहे. ते सरकारने बेदखल केले तर आम्ही म्हशीच्या गळ्यातला लोडना त्यांच्या पाठीत घालू ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्सेनिक गोळ्या खरेदी, पंधरावा वित्त आयोगाबाबत आपल्यावर टीका केल्यानंतर त्या-त्यावेळी प्रत्युत्तर दिले. परवा तर हसन मुश्रीफ यांची कृती म्हणजे आ बैल मुझे मार असे वक्तव्य त्यांनी केले. मात्र बैल अंगावर आल्यावर ...
कोरोनामुळे दुधाच्या विक्रीवर परिणाम झाल्याने गेल्या पाच महिन्यांपासून दुधाच्या पावडरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करावे लागत आहे. त्यामुळे गोकुळ व वारणा दूध संघांकडे १९२२ टन पावडर व ३३८४ टन बटर पडून असल्याने दूध संघांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. दे ...
अभिनेते महेश कोठारे यांची निर्मिती असलेल्या ह्यदख्खनचा राजा जोतिबाह्ण या आगामी मालिकेचा भूमिपूजन सोहळा रविवारी कोल्हापूर चित्रनगरीत पार पडला. या मालिकेसाठी भव्य सेट उभारण्यात येणार असून प्रत्यक्ष चित्रीकरणाला १५ सप्टेंबरपासून सुरुवात होईल. ...
दीड दिवसाच्या गणपतीचे रविवारी विसर्जन करण्यात आले. यामध्ये शहरातील ३८६ गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. यामध्ये दोन मंडळांचा समावेश आहे. महापालिकेच्या वतीने विसर्जन कुंड येथील संकलित झालेल्या मूर्ती इराणी खणीमध्ये विसर्जित करण्यात आल्य ...