Next

राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्या फेकल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 02:23 PM2019-09-16T14:23:05+5:302019-09-16T14:26:04+5:30

इस्लामपूर - गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात गाजत असणारा कथिक कडकनाथ कोंबडी खरेदी घोटाळ्याचे पडसाद आज पुन्हा एकदा पाहायला ...

इस्लामपूर - गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात गाजत असणारा कथिक कडकनाथ कोंबडी खरेदी घोटाळ्याचे पडसाद आज पुन्हा एकदा पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सांगली जिल्ह्यात आहे. यावेळी महाजनादेश यात्रेदरम्यान  कुंडल-सांगली रस्त्यावर मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर कडकनाथ कोंबड्या फेकल्या. स्वाभिमानी पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.