लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 21:29 IST2026-05-16T21:27:51+5:302026-05-16T21:29:42+5:30

Deputy CM Eknath Shinde News: गंभीर आजाराशी दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ रुग्णालयात फोन करून लहानग्या विराटवर तातडीने शस्त्रक्रिया करावी, असे सांगितले.

little virat bhosale was seriously ill deputy cm eknath shinde rushed to help provided relief by performing free surgery | लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा

लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा

Deputy CM Eknath Shinde News: सातारा जिल्ह्यातील मुनावळे गावचा ८ वर्षांच्या विराट भोसलेच्या मदतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले आहेत. त्याच्या नाकावर आणि घशावर विनामूल्य शस्त्रक्रिया करून शिंदे काकांनी त्याला मोठा दिलासा मिळवून दिला आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या गावाजवळील मुनावळे गावात राहणाऱ्या विराटच्या नाकात आणि घशात जन्मतः एक गाठ होती. जस जसा तो मोठा होत गेला तशी या गाठी वाढत गेल्या. त्यामुळे रात्री झोपेत श्वास घेणे त्याला दिवसेंदिवस अवघड होत होते. सातारा येतील आठवले रुग्णालयात याबाबत तपासणी केली असता या आजारावर शस्त्रक्रिया करणे हाच उपाय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

या शस्त्रक्रियेचा खर्च पालकांना परवडणारा नव्हता

या शस्त्रक्रियेचा खर्च दीड लाख रुपयांपर्यंत होता, जो त्याचे वडील विष्णू भोसले आणि आई मनिषा भोसले यांना परवडणारा नव्हता. विष्णू भोसले यांचे नातेवाईक त्यांना शिंदे दरे गावात विश्रांतीसाठी गेले असता त्यांची भेट घेऊन विराटची ही अडचण त्यांनी शिंदे त्यांच्या लक्षात आणून दिली. तसेच हा आजार काहीसा वेगळा असल्याने सरकारी योजनेच्या कक्षेत बसणे अवघड जात असल्याचे सांगितले. 

अखेर त्याचे उपचार पूर्ण झाले

अखेर भोसले कुटुंबीयांची ही अडचण समजल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ ठाण्यातील डॉ. अमोल गीते यांच्या सिद्धिविनायक रुग्णालयात फोन करून लहानग्या विराटवर तातडीने शस्त्रक्रिया करावी असे सांगितले. तसेच त्यासाठी लागणारा सर्व खर्च आपण करू असे सांगत मुलगा लहान असल्याने त्याला कोणताही त्रास न होऊ देता त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी असेही सांगितले. यानंतर तत्काळ विराटला ठाण्यातील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांचा नाकावर डॉ. कौस्तुभ मेहता यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. तसेच त्याला पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले. अखेर आज त्याचे उपचार पूर्ण झाले असून त्याला घरी सोडण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. 

दरम्यान, विराटचे वडील विष्णू भोसले यांनी सिद्धिविनायक हॉस्पीटलचे संचालक डॉ. अमोल गित्ते, डॉ. कौस्तुभ मेहता आणि रुग्णालयाच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानले. तसेच आपल्या दिल्या हाकेला धावून येत गावच्या जवळ राहणाऱ्या चिमुकल्या विराटच्या मदतीला धावून आल्याबद्दल भोसले कुटुंबीयांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आभार मानले. अडल्या नडलेल्या लोकांच्या मदतीला उपमुख्यमंत्री शिंदे हे कायमच धावून जातात, मात्र आपल्या गावाच्या जवळ राहणाऱ्या विराट भोसलेच्या चेहऱ्यावरील हरवलेले हसू पुन्हा आणून देत शिंदे यांनी आपल्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय दाखवून दिला आहे.

 

Web Title : उपमुख्यमंत्री शिंदे ने युवा विराट को मुफ्त जीवनरक्षक सर्जरी से मदद की

Web Summary : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने 8 वर्षीय विराट भोसले को गले की समस्या के लिए मुफ्त सर्जरी से मदद की। सर्जरी का खर्च वहन करने में असमर्थ, विराट के परिवार को शिंदे से तत्काल मदद मिली, जिन्होंने ठाणे में ऑपरेशन की व्यवस्था की। सफल सर्जरी से परिवार को राहत मिली, जो शिंदे की दयालु प्रकृति को दर्शाती है।

Web Title : DCM Shinde Helps Young Virat with Free Life-Saving Surgery

Web Summary : Deputy CM Eknath Shinde aided 8-year-old Virat Bhosle with a free surgery for a throat condition. Unable to afford the surgery, Virat's family received immediate help from Shinde, who arranged the operation in Thane. The successful surgery brought relief to the family, showcasing Shinde's compassionate nature.