Mohammed Siraj Drops Finn Allen AS KKR Opener Smashes 93 Runs : कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या ऐतिहासिक मैदानात ‘करो वा मरो’च्या लढतीत प्रथम फलंदाजीला उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खराब झाली. कर्णधार अजिंक्य रहाणेला बोल्ड करत मोहम्मद सिराजनंगुजरात टायटन्सला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर जेसन होल्डरनं फिन ॲलनविरुद्ध ‘वॉरंट’ काढलं होतं; पण DSP सिराज त्याला ‘अरेस्ट’ करण्यात अपयशी ठरला. सिराजनं सोपा झेल सोडल्यावर न्यूझीलंडच्या फिन ॲलननं ईडन गार्डन्सवर अक्षरशः धुमाकूळ घातला. त्याचे शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं. पण ९३ धावांच्या वादळी खेळीसह कोलकाताच्या संघाला त्याने मजबूत स्थितीत नेले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आधी सिराजच्या गोलंदाजीवर जेसन होल्डरनं कॅचची संधी सोडली, मग...
फिन ॲलन १४ धावांवर असताना मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर जेसन होल्डरनं त्याला झेलबाद करण्याची संधी गमावली. मग जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर सिराजने एक सोपा झेल सोडला. दुसरा झेल सोडला त्यावेळी कोलकाताचा सलामीवीर ३३ धावांवर खेळत होता. त्यानंतर त्याने मोठ्या फटकेबाजीचा खास नजराणा पेश करताना फिन ॲलन याने ३५ चेंडू ४ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने ९३ धावांची दमदार खेळी केली. साई किशोरच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारताना तो नर्व्हस नाइंटीचा शिकार झाला राशिद खान याने त्याचा झेल टिपला.
Unwanted IPL Record : टीम इंडियात घेतलं; त्यालाच धु धु धुतलं! IPL मध्ये नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
दुसऱ्या शतकाची संधी हुकली, पण...
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा गाजवणाऱ्या फिन ॲलनकडून कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. पण सुरुवातीच्या सामन्यात त्याला आपल्या फलंदाजीतील खास धमक दाखवता आली नाही. सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध त्याने १७ चेंडूत ३७ धावांची खेळी केली होती. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ७ चेंडूत २८ धावा करून त्याने तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला. पण त्यानंतर तो संघर्ष करताना दिसला. पंजाब किंग्सविरुद्ध फ्क्त ६ धावा, लखनौ विरुद्ध ९ धावा तर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध त्याने फक्त १ धाव केली. हैदराबादच्या मैदानातील सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात १३ चेंडूत २९ धावांची खेळी करत त्याने दमदार कमबॅक केले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ४७ चेंडूत शतकही त्याच्या भात्यातून पाहायला मिळाले. त्यानंतर RCB विरुद्ध १८ धावांवर बाद झाल्यावर पुन्हा एकदा त्याला दुसरे शतक झळकावण्याची संधी होती. पण तो फक्त ७ धावांनी कमी पडला.