नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 20:01 IST2026-05-16T20:00:33+5:302026-05-16T20:01:24+5:30

बिहारच्या जमुई जिल्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने (EOU) मोठी कारवाई केली आहे. झाझा येथील इंजिनिअर गोपाल कुमार याच्याविरोधात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गोळा केल्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली

Bundles of notes, jewelry and a luxurious flat; Crores of rupees found with engineer, raids at 4 locations | नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड

फोटो - ndtv.in

बिहारच्या जमुई जिल्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने (EOU) मोठी कारवाई केली आहे. झाझा येथील इंजिनिअर गोपाल कुमार याच्याविरोधात उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गोळा केल्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली. EOU च्या पथकाने पाटण्यातील मॅजिस्ट्रेट कॉलनीतील जगत व्हिला अपार्टमेंट, कंकडबाग येथील निवासस्थान, जमुईमधील केकेएम कॉलेजसमोरील भाड्याचं घर आणि झाझा येथील कार्यालय अशा एकूण ४ वेगवेगळ्या ठिकाणांवर एकाच वेळी धाड टाकली. या धाडीमुळे संपूर्ण विभागात खळबळ उडाली आहे.

इंजिनिअरविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे सुमारे २ कोटी ६१ लाख रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे, जी त्यांच्या अधिकृत उत्पन्नापेक्षा जवळजवळ ८१.५ टक्क्यांनी जास्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारी दरम्यान पथकाने अनेक महत्त्वाची कागदपत्रं आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जप्त केले असून त्याची सखोल चौकशी केली जात आहे.

इंजिनिअरची स्थावर-जंगम संपत्ती, बँक खाती आणि गुंतवणुकीचे दुवे देखील शोधले जात आहेत. गोपाल कुमारच्या घरातून मोठ्या प्रमाणात दागिनेही सापडले असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या EOU या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. पुढील कारवाई तपासाअंती समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे केली जाईल.

येत्या काही दिवसांत या तपासाच्या आधारे आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच दरम्यान या कारवाईनंतर ग्रामीण विकास विभागासह जिल्ह्यातील शासकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे. बिहारमधील भ्रष्टाचाराविरुद्ध सरकारच्या कडक धोरणाच्या पार्श्वभूमीवर या कारवाईकडे एक मोठा संदेश म्हणून पाहिले जात आहे.

Web Title : इंजीनियर ने जमा की दौलत: छापे में नकद, गहने, फ्लैट बरामद

Web Summary : बिहार के इंजीनियर गोपाल कुमार पर भ्रष्टाचार के आरोप लगे हैं क्योंकि छापे में 2.61 करोड़ रुपये से अधिक की अनुपातहीन संपत्ति का पता चला है। अधिकारियों ने चार स्थानों पर तलाशी ली, दस्तावेज और गहने जब्त किए। जांच जारी है, और आगे खुलासे की उम्मीद है।

Web Title : इंजीनियर ने जमा की दौलत: छापे में नकद, गहने, फ्लैट बरामद

Web Summary : बिहार के इंजीनियर गोपाल कुमार पर भ्रष्टाचार के आरोप लगे हैं क्योंकि छापे में 2.61 करोड़ रुपये से अधिक की अनुपातहीन संपत्ति का पता चला है। अधिकारियों ने चार स्थानों पर तलाशी ली, दस्तावेज और गहने जब्त किए। जांच जारी है, और आगे खुलासे की उम्मीद है।