तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 22:31 IST2026-05-16T22:30:02+5:302026-05-16T22:31:40+5:30
Tamil Nadu CM Vijay Cabinet Expansion: तामिळनाडूतील खातेवाटप करण्यात आले असून, अनेक विभागांच्या जबाबदाऱ्यांबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
Tamil Nadu CM Vijay Cabinet Expansion: तामिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आता मुख्यमंत्री विजय यांनी मंत्रिमंडळ विस्तार करत खातेवाटप जाहीर केले आहे. सी. जोसेफ विजय यांनी गृह, पोलीस आणि महिला व बाल कल्याण यांसारखी काही अत्यंत महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवली आहेत, तर टीव्हीकेचे ज्येष्ठ नेते के. ए. सेंगोत्तैयन यांच्याकडे अर्थ मंत्रालय तसेच निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतन भत्ते खात्याचा कार्यभार देण्यात आला आहे.
आधव अर्जुन सार्वजनिक बांधकाम आणि क्रीडा विकास मंत्री झाले. इमारत बांधकाम, महामार्ग आणि लहान बंदरे यांसारख्या सार्वजनिक कामांची, तसेच क्रीडा विकासाची देखरेख करतील. डॉ. के. जी. अरुणराज यांच्याकडे आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि कुटुंब कल्याण या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली. पी. व्यंकटरमणन अन्न व नागरी पुरवठा मंत्री झाले.
सर्वांत तरुण मंत्री सेल्वी एस. कीर्तना यांना उद्योग खाते
विजय यांचे निकटचे सहकारी आणि टीव्हीकेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक मानले जाणारे एन. आनंद यांच्याकडे ग्रामीण विकास आणि जल खाते सोपवण्यात आले आहे. सर्वांत तरुण मंत्री असलेल्या सेल्वी एस. कीर्तना यांच्याकडे उद्योग खाते देण्यात आले आहे. एका महिला मंत्र्याला इतके महत्त्वाचे खाते दिल्याने तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, आर. निर्मलकुमार यांच्याकडे ऊर्जा संसाधने आणि कायदा विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. तसेच कायदा, न्यायालये, तुरुंग आणि भ्रष्टाचारविरोधी, विधानसभा, राज्यपाल, निवडणुका आणि पासपोर्ट यांचाही समावेश आहे. राजमोहन यांच्याकडे शालेय शिक्षण, तमिळ विकास, माहिती आणि प्रसिद्धी मंत्रिपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. पुरातत्व, तमिळ अधिकृत भाषा आणि तमिळ संस्कृती, चित्रपट तंत्रज्ञान आणि सिनेमा कायदा, वृत्तपत्र नियंत्रण, लेखनसामग्री आणि मुद्रण आणि शासकीय मुद्रणालय या विभागांचेही पर्यवेक्षण ते करतील. डॉ. टी. के. प्रभू यांना नैसर्गिक संसाधने मंत्रालय देण्यात आले असून ते खनिजे आणि खाण विभागाचा कार्यभार स्वीकारतील.
Tamil Nadu Cabinet portfolios | CM C. Joseph Vijay keeps Public, General Administration, Indian Administrative Service, Indian Police Service, Indian Forest Service, District Revenue Officers, Police, Home, Special Programme Implementation, Women Welfare, Youth Welfare, Welfare… pic.twitter.com/FLGudBOOae
— ANI (@ANI) May 16, 2026