IPL 2026 KKR vs GT Finn Allen Record : कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात कोलकाताचा सलामीवीर फिन ॲलन याने उत्तुंग षटकारांची अक्षरश: आतषबाजी केली. ३५ चेंडूत ९३ धावांची धमाकेदार खेळी करताना त्याने ४ चौकार आणि १० षटकार खेचले. या खेळीत त्याने IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला जमलं नाही तो पराक्रम करून दाखवला. एका हंगामात दोन डावात प्रत्येकी १०-१० षटकार मारण्याचा महारेकॉर्ड त्याने आपल्या नावे केला आहे. IPL मध्ये अशी कामगिरी करणारा क्रिकेट जगातील तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अन्य कोणत्याही फलंदाजाला जमलं नाही ते फिन ॲलन याने करून दाखवलं
गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यातील डावात १० षटकार मारण्याआधी त्याने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात नाबाद शतकी खेळीत १० षटकार मारले होते. यासह षटकारांच्या आतषबाजीचा खास रेकॉर्ड त्याच्या नावे झाला. IPL च्या आतापर्यंतच्या इतिहासात अनेक फलंदाजांनी एका डावात १० किंवा त्यापेक्षा अधिक षटकार खेचले आहेत. पण एका हंगामात दोन वेळा ही कामगिरी करणारा फिन ॲलन पहिला फलंदाज ठरला आहे.
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
या यादीत गेलसह वैभव सूर्यवंशीचंही नाव
ख्रिस गेल याने २००९ ते २०२१ दरम्यानच्या IPL कारकिर्दीत चार वेळा एका डावात १० किंवा त्यापेक्षा अधिक षटकार ठोकले होते. मात्र एका हंगामात दोनदा हा पराक्रम त्यालाही करता आला नव्हता. फिन ॲलनशिवाय एका डावात १० षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत १५ वर्षीय युवा बॅटर वैभव सूर्यवंशीसह अभिषेक शर्माचाही समावेश आहे.
आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारणारे धुरंधर
ख्रिस गेल याने २०१३ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून नाबाद १७५ धावांची खेळी केली होती. या सामन्यात त्याने १७ षटकार मारले होते. २०१२ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने १३ षटकार तर २०१५ च्या हंगामात पंजाब किंग्सविरुद्ध त्याच्या बॅटमधून १२ षटकार पाहायला मिळाले होते. याशिवाय पंजाबच्या ताफ्यातून २०१८ च्या हंगामात त्याने ११ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे. वैभव सूर्यवंशी याने २०२६ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध १०३ धावांची खेळी करताना १२ षटकार मारले होते. गत हंगामात पहिले शतक झळकावताना त्याने गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात ११ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.